केंद्रानं ट्रेन पाठवल्या तरी रिकाम्या पाठवणं तुमची जबाबदारी होती, चंद्रकांत पाटील यांचं मविआच्या नेत्यांना प्रत्युत्तर

| Updated on: Feb 08, 2022 | 1:39 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil )यांनी महा विकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.

केंद्रानं ट्रेन पाठवल्या तरी रिकाम्या पाठवणं तुमची जबाबदारी होती, चंद्रकांत पाटील यांचं मविआच्या नेत्यांना प्रत्युत्तर
चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सवाल
Follow us on

पुणे: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil )यांनी महा विकास आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. सुप्रियाताई सुळे, (Supriya Sule) नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी मोदीजी काय म्हणालेत हे लोकांना नीट कळलं आहे,असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नरेंद्र मोदींच एवढंच म्हणणं आहे की, कोरोनाच्या आपल्या राज्यात नागरिकांची सेवा करण्याऐवजी आपल्या वरची जबाबदारी झटकण्यासाठी तुम्ही तुमच्या गावाला जा असं सांगण्याचा जो प्रयत्न झाला. त्या प्रयत्नांतून लोकांची परवड झालीआणि त्या राज्यांत कोरोना संसर्ग वाढला. महाराष्ट्राच्या द्वेषाचा काही विषय नाही. महाराष्ट्रच नाही संपूर्ण देशाला जे दिल ते मोदींनी दिले. महाराष्ट्र शासनाने काय दिल याची श्वेतपत्रिका जाहीर करा,अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

कोरोना काळात भाजप कार्यकर्ते फिल्डवर

सुप्रियाताई किती ही केविलवाणी धडपड केली. बाळासाहेब थोरात तुम्ही कोरोना काळात कुठल्या बिळात लपला होता हे लोकांना चांगलं माहीत आहे. फिल्डवर भाजपचे कार्यकर्ते होते. योजना केंद्राच्या होत्या तुम्ही काय दिल? लॉकडाऊन मध्ये झालेलं आर्थिक नुकसान हे मोदींनी भरून काढलं. रेल्वे केंद्राने सोडल्या तरी तुमची जबाबदारी होती त्या रेल्वे रिकाम्या जातील याची खबरदारी घेण्याची. लोकांना तुम्ही विश्वास द्यायला हवा होता. आम्ही तुमची काळजी घेऊ, आम्ही तुमचं पोट भरू हा आत्मविश्वास तुम्ही परप्रांतीय लोकांना देऊ शकला नाही हे तुमचं अपयश आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्याकडून मोठेपणा शिका

मला आश्चर्य वाटलं तुमच्या बोलण्यात राऊत अजून कसे आले नाहीत, राऊत आलेच पाहिजेत त्याच्याशिवाय आपला इंटरव्ह्यू संपत नाही त्यामुळे नमस्कार, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अधिक भाष्य करणं टाळले.

शरद पवार यांचा मोदींनी उल्लेख केल्याबद्दल विचारलं असता तो मोदींच्या मनाचा मोठेपण आहे. त्यांच्याकडून काही तरी शिका मोदी आपला विरोधक जरी असला दुष्मन जरी असला तरी त्याच्याबद्दल जे चांगल आहे त्याच कौतुक करतात. तुम्हाला चांगल्याच कौतुक करता येत नाही त्यामुळे मोदींकडून काही शिका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

इतर बातम्या

PM Narendra Modi: बाळासाहेबांना बदनाम करण्यासाठी कुणाचा उपयोग केला?; डेमोक्रसीवरून मोदींनी काँग्रेसच्या कृत्यांची यादीच वाचली

Pune : किरीट सोमय्या हल्ला प्रकरणी शिवसैनिक पोलीस ठाण्यात हजर, सोमय्या राज्यपालांच्या भेटीला

Chandrakant Patil gave answer to MVA leaders who attacked on Narendra Modi statement