पुणे : पुण्यातील पोटनिवडणुकीचा निकाल लागल्यावर राज्यातील सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. जवळपास 28 वर्षे बालेकिल्ला राहिलेल्या कसबा मतदारसंघ काँग्रेसने काबिज केला आहे. या निवडणुकीच्या प्रचारामध्ये शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रीही उतरले होते. मात्र रविंद्र धंगेकर यांनी 11 हजारापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवत इतिहास रचला. अशातच भाजपचे नेते आणि आमदार चंद्रकांत पाटील यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये नेटकऱ्यांकडून चंद्रकांत पाटलांना ट्रोल करण्यात येत आहे.
हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ निवडणुकीच्या अगोदरचा आहे. चंद्रकांत पाटील हेमंत रासने यांच्या प्रचारावेळी बोलत आहेत की, Who is Dhngekar? म्हणजे कोण आहेत धंगेकर असं बोलणाऱ्या पाटील यांना मतदारांनी धंगेकर कोण आहेत हे दाखवून दिलं आहे.
रविंद्र धंगेकर यांच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करत चंद्रकांत पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. पब्लिक की डिमांड थी… तो भाऊ को आना पडा.. साऱ्या पुण्यात इतिहास घडला पायरी यशाची एक एक चढला विरोधकांचा धुरळा उडला बघा कार्याचा प्रकाश पडला आला आला आला रवींद्र धंगेकर आला…, अशा मीम्सचा देखील सोशल मीडियावर वर्षाव होताना दिसतोय.
चंद्रकांत पाटील यांचा ‘तो’ जुना व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल#कसबापोटनिवडणुक #viral #ravindradhangekar #म pic.twitter.com/wwxs1OEtM3
— Harish Malusare (@harish_malusare) March 3, 2023
सभेमध्ये पाटील बोलून गेले की बोलून गेले की धंगेकर कोण आहेत? मात्र रविंद्र धंगेकर यांनी विजय मिळवत इतिहास रचलाय. रविंद्र धंगेकर यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी व्हिडीओ तयार केला आहे. ज्यामध्ये पाटलांचा सभेतील, Who is Dhngekar असं विचारतानाची क्लिप त्यानंतर गाणी लावत व्हिडीओ एडिट केला आहे. सोशल मीडियावर हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. अनेकांनी हा व्हिडीओ व्हाट्सअॅप स्टेटसला ठेवला आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू!