पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (cm uddhav thackeray) राजकारण गढूळ झालय असं वाटत असेल आणि ते सुडाचे राजकारण करत नसतील तर त्यांनी राऊतांना आता शांत बसवावे. सर्व काही ठिक होईल. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचं घर उद्ध्वस्त करायची सुपारी घेतली आहे असा माझा अंदाज आहे. उद्धवजींनी बटन ऑफ करून राऊतांना शांत करावं. आपोआप सगळं शांत होईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मीडियाशी संवाद साधताना पाटील यांनी शिवसेना आणि संजय राऊतांवर घणाघाती हल्ला केला. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर राऊत कसा पलटवार करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिका लोकार्पण आणि अपंगांना साहित्याचे वाटप करण्यात आले. येरवडा येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे युवक संघटना आणि आरपीआय आठवले गटाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. भाजप- आरपीआयच तिकीट मिळालं की तुम्ही नगरसेवक झाला. अजित दादांनी कितीही आदळ आपट करु दे. आरपीयाने कोणाला तिकीट द्यायचं ते ठरवावं, निवडून आणायची जबाबदारी आमची, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
शिवसेना-भाजपने एकत्र यावे असं रिपाइं नेते रामदास आठवले वारंवार सांगत असतात. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप-सेनेने एकत्र यावे ही रामदास आठवले मनापासून त्यांची इच्छा व्यक्त करत आहेत. पण आपण जी इच्छा व्यक्त करतो तसं होतच असं नाही. जरी छगन भुजबळ मला भविष्य सांगणार जोशीबुवा असं म्हणाले असले तरी मी भविष्य सांगणारा जोशीबुवा नाही. त्यामुळे नजीकच्या काळात भाजप – सेना एकत्र येतील की नाही हे मला माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही प्रतित्युत्तर दिलं आहे. 2024मध्ये काँग्रेसला बाजूला ठेऊन सगळे एकत्र येणार आहेत. त्यामुळे शुभारंभालाच फाटाफूट झाली आहे. उद्घाटनाचा नारळ फोडतानाच फाटाफूट ठरलेली आहे. 2024 ला बँडबाजा वाजणारच आहे. राजकारणात स्वप्न बघायला काही हरकत नसते, असा टोला त्यांनी लगावला.
केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर कारवाई होणार आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा सर्व अॅक्शन-रिअॅक्शनचा खेळ सुरू आहे. यात कोण टिकतं ते बघू. राणे समर्थ आहेत. भाजप राणेंच्यापाठी खंबीर उभा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 21 February 2022 pic.twitter.com/rHuxIwWrsQ
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 21, 2022
संबंधित बातम्या:
Kirit Somayya | ईडीकडे तक्रार कशी करायची असते? किरीट सोमय्यांनी घेतली राऊतांची शाळा!
नाशिक महापालिकेत महाविकास आघाडी फिस्कटली; काँग्रेस प्रभारींनी काय दिले आदेश?