पुणे : पिंपरी चिंचवड येथे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा दौरा होता. पुन्हा शाईफेकण्याची धमकी सोशल मीडियातून देण्यात आली होती. शाईफेकीच्या धमकीमुळं चंद्रकांत पाटील खबरदारी (precaution) म्हणून फेसशिल्ड वापरू लागलेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक झाली होती. त्यानंतर एका दौऱ्यात चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवडमध्ये होते. मात्र, शाईफेकीच्या धमकीमुळं चंद्रकांत पाटील फेसशिल्ड लावून पोहचले. विकास लोलेंसह आणखी काही जणांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा शाईफेक होणार का, यावरची पोस्ट केली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतलं. विकास लोले हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असल्याची माहिती आहे.
याआधी परभणीत चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर शाईफेक होऊ शकते, या भीतीनं पोलिसांनी पत्रकारांचीही तपासणी केली होती. कुणाच्या खिशात शाईचं पेन नाही ना, याच्या पडताळणीनंतरच पत्रकारांना पत्रकार परिषदेसाठी सोडण्यात आलं होतं.
याआधीच्या घटनेत चंद्रकांत पाटील यांच्या डोळ्यात शाई गेली होती. काही काळापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी डोळ्याचा कँसर झाला होता. त्यामुळं डोळा गोधळीसारखा शिवलेला आहे. शाईफेकीनंतर डोळ्यांच्या पापन्यांवर शाई चिपकली होती. डॉक्टरांनी ती क्लीन करून दिली. नशीब डोळ्याला काही झालं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
राज्यात सरकार शिंदे-फडणवीस यांचं आहे. चंद्रकांत दादा हे भाजपचे नेते आहेत. शिवाय राज्याचे मंत्री आहेत. तरीही यापूर्वीचा अनुभव बघता त्यांनी विशेष काळजी घेतली. कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाताना त्यांनी फेसशिल्ड वापरली होती. यानंतरतरी डोळ्याला इजा होऊ नये, यासाठी ते काळजी घेत आहेत.