पुणे: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला मोठा इशारा दिला आहे. आमची क्लिअर भूमिका आहे. आम्ही ठरवलंय, 51 टक्क्यांची लढाई लढायची आणि महाविकास आघाडीचा ऑटो पंक्चर करायचाय, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. (chandrashekhar bawankule slams maha vikas aghadi)
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. चांदा ते बांदा दरम्यानच्या मतदान केंद्रावर 25 लाख युवांना संकल्प यात्रा काढून जोडण्याचं अभियान सुरू करण्यात आलं आहे. 25 डिसेंबर हा अटलजींचा वाढदिवस आहे. त्या दिवशी आम्ही हा संकल्प पूर्ण करू, असं बावनकुळे म्हणाले.
यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरून ठाकरे सरकारवर टीका केली. महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामूळे ओबीसी, मराठा आरक्षण गेलं. आम्हाला या सरकारचा बदला घ्यायचा आहे. कोर्टाने 4 मार्चला सांगितलं होतं की राज्य सरकारने डेटा तयार करावा. मात्र सरकारने डेटा तयार केला नाही. हा डेटा सेन्सस डेटा आहे. त्यावेळी मनमोहन सिंगांनी सांगितलं होतं यात चुका आहेत. अजित पवारांनी खोटी माहिती दिली. या सरकारला आरक्षण द्यायचं नाही. त्यांना अन्यायच करायचा आहे, असा आरोप त्यांनी केला.
शेतकऱ्यांच वीज कनेक्शन कापणं सुरू झालंय. हे सरकार मुघलांसारखे वागत आहे. युवकांचे प्रश्न आहेत, आरोग्य विभागाची परीक्षा जाहीर केली आणि 12 तास आधी रद्द केली, हा सर्वच सावळागोंधळ सुरू आहे, असं ही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री वांद्र्यापूरते आणि मंत्री गावापूरते राहिले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
राज्यातील तीन पक्ष आपआपला अजेंडा घेऊन चालले आहेत. ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं 100 युनिट विजबिल माफ करू. मात्र उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर सही केली नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 18 तास सरकार चालायचं आता मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाही. मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजना बंद पाडली. फडणवीसांनी सुरू केलेली ही योजना बंद आहे. मात्र नितीन गडकरींची केंद्रीय रस्ते योजना सुरू आहे. महाराष्ट्रातल्या योजना गेल्या कुठे?, असा सवालही त्यांनी केला. (chandrashekhar bawankule slams maha vikas aghadi)
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 26 September 2021 https://t.co/wMZJasE8iD #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 26, 2021
संबंधित बातम्या:
दिल्लीत जेवणाच्या टेबलवर आजी, माजी आणि भावी, ठाकरे-शहा एकमेकांच्या बाजूला, नेमकं काय शिजलं असेल?
13 वर्षीय चिमुकलीची कुऱ्हाडीने हत्या, मुलीचा बाप इतका निर्घृणपणे का वागला?
(chandrashekhar bawankule slams maha vikas aghadi)