Video : पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 18×12 भव्यदिव्य रांगोळी, 350 दिव्यांचा दीपोत्सव

| Updated on: Jun 06, 2023 | 9:30 PM

राज्यभरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक ऐतिहासिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर पुण्यामधील स्वर्गीय इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानासमोर 350 व्या राज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती.

Video : पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 18×12 भव्यदिव्य रांगोळी, 350  दिव्यांचा दीपोत्सव
Follow us on

पुणे : अवघ्या महाराष्ट्र दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहा त महाराष्ट्रभर साजरा झाला. राज्यभरात अनेक ठिकाणी सांस्कृतिक ऐतिहासिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर पुण्यामधील स्वर्गीय इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानासमोर 350 व्या राज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती.

पुण्यातील पर्वती विकास ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय पुण्यभूषण श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवासस्थानासमोर 350 शिवराज्याभिषेकदिनी छत्रपती शिवाजी महाराज यांची 18×12 रांगोळी काढण्यात आली होती. त्यासोबतच 350 दिव्यांचा दीपोत्सव पर्वती विकास ट्रस्ट यांच्या माध्यमातून पर्वती येथे संपन्न झाला.

 

रांगोळीमध्य छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसले असून त्यांच्यामागे प्रखर सूर्य दिसत आहे. पुण्यातील अनेकांनी या रांगोळी काढणाऱ्या कलाकाराचं आवर्जुन कौतुक केलं. शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना हाताशी घेत स्वराज्य उभं केलं होतं. महाराजांच्या पराक्रमाला कायम मानाच मुजरा त्यामुळे शिवभक्त महाराजांचा प्रताप आठवत जमेल त्या पद्धतीने त्यांच्या कार्याचं स्मरण करून देतात.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गडांवर आज 350 व्या राज्यभिषेक दिनाचं औचित्य साधत गडावर सफाईचं काम केलं. गडावरील प्लॅस्टिकच्या बॉटल जमतील तितक्या पोत्यात भरल्या आणि सोबत खाली गडावरून खाली आणल्या. तरूण- वृद्ध सर्वांनी या उपक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.