“सगळ्यांनी प्रयत्न केले आणि विद्यार्थ्यांना यश आलं”; एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री म्हणाले…

| Updated on: Feb 23, 2023 | 7:54 PM

एमपीएसी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना आणि त्यांना शुभेच्छा देताना त्यांनी हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सगळ्यांनी प्रयत्न केले आणि विद्यार्थ्यांना यश आलं; एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री म्हणाले...
Follow us on

मुंबईः राज्यसेवेच्या वर्णनात्मक परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी 2025 पासून सुरू करावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन पुकारले होते. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकारणही ढवळून निघाले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह शरद पवार यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यावर तोडगा काढण्याचे अश्वासन दिले होते. यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेण्यासाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती.

त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या आयोगाला कळवल्या जातील असा शब्दही त्यांनी दिला होता. त्यामुळे आता आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली.

 

त्यामुळे आता उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2025 पासून लागू करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले होते. या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांचे आभारही मानण्यात आले होते.

एमपीएससी विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनीही त्यांचे अभिनंदन करत आयोगाने आता अभ्यास करण्यासाठी वेळ दिला असल्याचे सांगितले.

परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले, त्यामुळे विद्यार्थ्यांना यश आले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आजचा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. याबद्दल एकनाथ शिंदे यांनी आयोगालाही धन्यवाद दिले आहेत.

एमपीएसी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना आणि त्यांना शुभेच्छा देताना त्यांनी हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात असलेले शिंदे फडणवीस सरकार हे लोकांच्या भावना समजून घेत असते. आमचे सरकार ज्या प्रमाणे बोलत असते,त्या प्रमाणे निर्णय घेत असते असंही त्यांनी यावेळी घेतले. आयोगाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासासाठी वेळ दिला गेला आहे.

त्यामुळे या निर्णयाचे सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले. अभ्यासक्रमाचा निर्णय हा महाविकास आघाडीच्या काळात घेतला गेला होता, मात्र आम्ही विद्यार्थ्यांचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.