पुणे : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान मोदी (Pm Modi Pune Tour) उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मात्र मोदींच्या या दौऱ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) उपस्थित असणार नाहीत. राज्य सरकारच्या वतीने अजित पवार (Ajit pawar) आणि सुभाष देसाई हे यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना जास्त प्रवास करता येत नसल्याने मुख्यमंत्री उपस्थित नसल्याचे सागण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावरून याआधीही भाजपकडून महाविकास आघाडी आणि मुख्यमंत्र्यांवर टीका झाली आहे. गेल्या अधिवेशनातही मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थित गदारोळ झाला आहे. तसेच मोदींसोबतच्या कोरोना आढावा बैठकीवरून राजकारण तापलं होतं. त्यामुळे पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्याता आहे.
मोदी विविध विकासकामांचे उद्घाटन करणार
उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन केले जाणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेयांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. याचा दौऱ्यामध्ये पुणे महानगरपालिकेत उभारण्यातआलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरणही सोहळाही पडणारा आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका , मेट्रो स्थानक परिसरात . एसपीजी आणि पुणे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 150 पोलीस कर्मचाऱ्यांचा असणार महापालिकेत बंदोबस्त असणार आहे. या या कार्यक्रमासाठी पास असेल त्या व्यक्तीलाच महापालिकेत सोडलं जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
असा असेल मोदींचा पुणे दौरा
महामेट्रोच्या उदघाटनासाठी पुण्यात येणार आहेत उद्या (6 मार्च) सकाळी 10:30 मिनीटांनी लोहगाव विमानतळावर आगमन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा पारपडणार आहे. पंतप्रधान मेट्रोच्या उद्घाटनासाठी गरवारे महाविद्यालय येथील मेट्रो स्टेशनवर जातील. तेथून मेट्रोने ते आनंदनगर स्टेशन येथे जाणार आहेत. मेट्रोचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर मोदींची जंगी सभा होणार, आगामी महापालिका निवडणुकीसाठी ही सभा महत्त्वपूर्ण ठरणार असून , भाजप कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळणार आहे.