पुणे : शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्या प्रकरणात आता खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत. पीडित तरुणीने आता थेट भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर गंभीर आरोप केले आणि चित्रा वाघ यांनी मला खोटे आरोप करायला लावले असे म्हटले आहे. हे आरोप फेटाळताना चित्रा वाघ म्हणाल्या, एक मुलगी एकटी लढत होती, तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत असल्याची तक्रार माझ्याकडे आली. एखादी मुलगी पुराव्यासहीत सांगत आहे, मला काय माहिती कुठलं हॉस्पिटल कुठे आणि काय? ही माहिती सर्व त्या मुलीने मला दिली. ती एकटी आहे म्हणून मी तिच्यासोबत उभा राहिली ही चूक आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच पोलीस (Pune Police) कसा त्रास देत आहेत हेही सांगितलं. परवा तिला चालता येत नव्हतं, मी डॉक्टरांना तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगितलं. मी सांगितलं ससूनला जायचं आहे, तर ती जाहंगीरला गेली. या सगळ्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे. कोणही तिच्या बरोबर नव्हतं मी एकटी लढली आणि आज माझ्यावर खोटे आरोप करतात. असे त्या म्हणाल्या.
तसेच ती कुठल्या मजबुरीत का हे करते आहे हे मला माहिती नाही. आणि हे सगळं करून माझा आवाज बंद होणार नाही. मला केसमध्ये अडकण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र माझी सर्व तयारी आहे. माझ्या घरावरही हल्ले झाले. माझा सीडीआर रिपोर्टही पोलीस काढू शकतात, असे थेट आव्हान चित्रा वाघ यांनी दिले आहे. तसेच पीडितेचा मेसेज मी तसाच्या तसा गृहमंत्र्यांना पाठवला, असेही त्यांनी सांगितलं. त्या मुलीलीवर दबाव आणला असेल म्हणून ती अशी बोलत असेल असेही चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणात अशा प्रकारे वळण मिळालं तर इतर महिला समोर येणाही नाहीत असेही चित्रा वाघ म्हणाल्या
तसेचत राष्ट्रवादीनच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी नेते मेहबुब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर या प्रकरणावरून जोरदार टीका केलीय. तर चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर आणि शेख यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही कितीही दबाव आणा मात्र आमचं काम थांबणार नाही. आम्ही अशी प्रकरणं लपू देणार नाही. असेही त्या म्हणाल्या. तसेच ती एकटी मुलगी लढली याचं मला कौतुक आहे. याच्यापुढेही माझी मदत लागली तर मी तिच्या सोबत असेन असेही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. फेब्रुवारीपासून ही मुलगी लढते आहे, तेव्हा हे लोकं झोपले होते का? असा सवालही यांनी केला आहे. तसेच मेहबूब शेख यांना इशारा देताना शंभरजण रोज बांधून फिरते चित्रा वाघ, माझ्या नादी लागू नका, असेही म्हणाल्या.