पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटन झाले. उदघाटनानंतर मेट्रो (Metro) सर्वसामान्य नागरिकांना प्रवासासाठी खुली करण्यात आली आहे. मेट्रो प्रवासाचा आनंद घेत असताना या प्रवासाच्या नियमावलीचे (Metro Travel rule) पालन करणे आवश्यक असल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याबरोबरच मेट्रो प्रशासनाने मेट्रोच्या प्रवासाचे वेळापत्रकही प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये मेट्रोचे मार्ग व तिकीट दाराची माहिती देण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरीत दिवसभरात एकूण 13 तास मेट्रो धावणार असून, दार अर्ध्या तासाला मेट्रोची फेरी असणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर दुपारी तीननंतर सर्वसामान्य नागरिकांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. तसेच सात मार्चपासून सकाळी आठ ते रात्री नऊ या वेळेत दर अर्ध्या तासाने धावणार आहे.
#पुणेमेट्रो ने प्रवास करताना काय करावे, काय करू नये.
Dos and Don’ts while travelling in #PuneMetro.
#AaliApliMetro #AzadiKaAmritMahotsav pic.twitter.com/25msAtlIJu— Pune Metro Rail (@metrorailpune) March 6, 2022
Video | विमानाचं लॅन्डिंग तर नीटनेटकं झालं, पण लॅन्ड झाल्यानंतर रनवे सोडून भलतीकडे कसं काय घुसलं?
दौरा पंतप्रधान मोदींचा, गुजगोष्टी फडणवीस-अजित दादांच्या अन् चर्चा राजकीय गोडव्याची!
Rabi Season: कडधान्याचे पीक गतवर्षी साधले यंदा नेमके काय झाले? पीक पध्दतीमध्ये बदल करुनही निराशाच