पुणे – महापालिका प्रशासनाच्या (Municipal administration)ताब्यात आल्यापासून प्रशासनाने या अनेक निर्णय घेतले आहेत. अनधिकृत फलकबाजीवरही (Unauthorized panel)महापालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील अतिक्रमणावर कारवाई करत असताना दुसरीकडे महापालिकेच्या संदर्भात दाखले, पैसे भरण्याच्या सुविधांसह दिल्या जात आहे. या सुविधा देण्यासाठी व तक्रारींच्या निवारणासाठी महापालिकेकडून क्षेत्रीय कार्यालये सुरु करण्यात आली आहेत. आता या नागरी सुविधा केंद्राच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी . आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात (field office)एक समन्वयक अधिकारी (नोडल ऑफिसर) नेमला जाणार आहे.यामुळे नागरी सुविधा केंद्रांमधील गैरसोयी दूर होत नागरिकांना सहजरित्या मदत मिळणार आहे.
महापालिकेकडून एकूण 15 विविध विभागांतील सुविधा या सुविधा केंद्रातून दिल्या जातात. महापालिकेचा कार्यकाळ संपल्यापासून नागरिकांना उडवाउडवीची उत्तर दिली जात होती. याबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन समन्वयक अधिकारी नेमण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. या अधिकाऱ्यांमुळे महापालिकेला प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयावर नजर ठेवणे शक्य होणार आहे. हा अधिकारी या 15 विभागांशी समन्वय ठेवणार असून नागरिकांना येणाऱ्या अडचणी प्रत्यक्ष जागेवर सोडविल्या जाणार आहेत. याबरोबरच नागरिकांसाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या बाहेर तक्रार पेटीही ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना थेट तक्रार करणे सोप्पे होणार आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागापाठोपाठ आता मालमत्ता व्यवस्थापन विभागही जोरात कार्यरत असलेला दिसून आला आहे. गेल्या आठवडाभरात या विभागाने 3 कोटी 28 लाख रुपयांची थकबाकी असलेले 27 हून गाळे सील केले आहेत. शहरात महापालिकेच्या एकूण 3 हजार 899 मिळकती आहेत. काही मिळकती आर7 अंतर्गत ताब्यात आल्या आहेत. तर, महापालिकेने बांधकाम केलेल्या 19 मिळकती आहेत. हेक गाळे, दुकाने, हॉल अशा मिळकती पालिकेने व्यावसायिक कारणांसाठी भाड्याने दिले आहेत. त्यातील आतापर्यंत 59 कोटींपैकी 37 कोटी रुपये वसूल झाले आहेत. तर, अद्याप 22 कोटी रुपयांची थकबाकी कायम आहे. त्यामुळे वसुलीसाठी मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. जे व्यावसायिक भाडे भरणार नाहीत, त्यांचे गाळे सील करण्यात येणार असून थकबाकी न भरल्यास हे गाळे निविदा काढून वितरीत केले जाणार आहेत.
शिवसेनेला महाविकास आघाडीत कायमच दुय्यम वागणूक, तानाजी सावंतांची नाराजी
‘हसगत’ आणि ‘पत्रापत्री’सोबत दिलीप प्रभावळकरांची ‘नवी गुगली’, नवी कथा ऐका स्टोरीटेलवर…
Video : Urfi Javed फॅन्सी ड्रेस घालून आली, पण फोटो काढायला जागाच सापडेना… थेट वॉचमनशी भिडली