गेल्या अनेक वर्षांपासून पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याची घोषणा केली गेली आहे. विमानतळासाठी जागा कोणती निश्चित करावी याचीत अदलाबदली झाली. बाकी कोणतीही प्रशासकीय हालचाल पाहायला मिळाली नाही. कागदावर असलेलं विमानतळ प्रत्यक्षात कधी होणार की कामय राजकीय चर्चेचीच उड्डाण भरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यंदा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना यंदा डबल लॉटरी लागली. आधी लोकसभेचं तिकिट आणि निवडून आल्यावर केंद्रीय राज्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडली. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री या खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
पुरंदरचे विमानतळ लवकरात लवकर होण्याची शक्यता आहे. डीजीसीएने पुरंदर विमानतळला मान्यता दिली आहे. लवकरच जागेची पाहणी होणार असल्याची माहिती राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. शपथ घेतल्यावर पहिल्यांदा मोहोळ पुण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांसह समर्थकांनी मोहोळ यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदी त्यांना काय बोलले हे त्यांनी सांगितलं.
मला सकाळी जे. पी. नड्डा यांच्या पीएचा फोन आला, सांगितल की ११ वाजता पीएम हाऊसला बोलवलं आहे. मला विश्वास बसत नव्हता की खरच आहे की काय? स्वप्नवत होत हे सगळं पीएम हाउसला गेल्यावर वेगळ वाटलं. मोदी म्हणाले की, कैसे हो पुणेकर सहकार आणि सिविल एविएशनची दोन खाती मिळाली. बिग बॉस बरोबर काम करायला मिळणार, पुण्याला एक नंबर करायच आहे . पुणेकरांसाठी खूप काम करायचं असून आता पुणेकरांच्या अपेक्षा आता वाढल्या हे स्वाभाविक असल्याचं मुरलीधर मोहोळ म्हणाले.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेचे महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ यांनी जबाबदारी पार पाडली. पुण्यातून त्यांना तिकिट मिळाल्यावर त्यांची लढत काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्यासोबत झाली. यामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला होता.