पुणे: यंदाच्या पावसाळ्यात राज्यात जवळपास 13 ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ग्रामीण भागात रडारयंत्रणा नसल्याने या पावसाचे मोजमाप करणे शक्य झाले नाही. परंतु, संबंधित परिसरातील पावसाचे (Rain) एकूण स्वरुप पाहता राज्यात 13 ठिकाणी ढगफुटी झाल्याचा दावा हवामान आयआयटीएमचे हवामानतज्ज्ञ डॉ. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
ताम्हिणी घाटात 468 मिमी पावसाची नोंद झाली. तर चिपळूण आणि महाबळेश्वरमध्ये अनुक्रमे 400 आणि 480 मिमी पावसाची नोंद झाली. एका तासात 100 मी.मी पाऊस झाला तर त्याला जागतिक हवामान संघटनेच्या मापकानुसार ढगफुटी घोषित करण्यात येते, असे डॉ. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणक्षेत्राच्या परिसरातील पावसाचा जोर ओसरला आहे. पवना धरणातील पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत 4.99 टक्के तर गेल्या 72 तासांत 31.66 टक्के वाढ झाली. सध्या पवना धरणात 71.74 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला धरणात 34.96 टक्केच पाणीसाठा होता. गेल्या तीन दिवसात 579 मिमी पावसाची नोंद झाल्याने अशी सुखद परिस्थिती निर्माण झाली आहे.
साताऱ्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर कायम
तर दुसरीकडे साताऱ्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे. साताऱ्यात कोयना धरण परिसरात आतापर्यंत 2597 मिलीमीटर पाऊस पडला आहे. तर नवजाला 3427 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याशिवाय महाबळेश्वरमध्ये 3209 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
साताऱ्यात कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग?
?कोयना धरणातून 54541 क्यूसेसने विसर्ग
?धोम प्रकल्पातून 8711 क्यूसेसने विसर्ग
?कणेर प्रकल्पातून 7219 क्यूसेसने विसर्ग
?उरमोडी प्रकल्पातून 5 हजार 934 क्यूसेसने विसर्ग
?तारळी धरणातून 12 हजार 255 क्यूसेसने विसर्ग
?बलकवडी प्रकल्पातून 4 हजार 619 क्यूसेसने विसर्ग
संबंधित बातम्या :
Weather update today : कोकणावर संकट कायम, पुढचे 3 दिवस धोक्याचे, IMD च्या अंदाजाने धाकधूक कायम
(Cloudburst rain in 13 regions in Maharashtra)