पुणे- राजकारणातील नेत्यांचे फोन टॅप करणे आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांना (IPS officer Rashmi Shukla) चांगलंच महागात पडणार आहे. या फोन टॅपिंगची प्रकरणाची (Phone tapping case) सखोल चौकशी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) यांनी दिल्यानंतर, आता राज्य सरकारच्या आदेशानुसार पुण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात विधानसभेत आवाज उठवण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारने एक समिती स्थापन केली होती. या समितीने शुक्ला यांना या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने फोन टॅप केल्याचं समितीच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होत.
रेशमी शुक्ला यांनी फोन टेप करत असताना नेत्यांना गुन्हेगारांचे ‘कोडनेम’ दिले होते. त्यानंतर त्यांचे फोन टँपिंग केल्याचं पोलीस तपासात आलं पुढे आहे. यामध्ये नाना पटोले, बच्चू कडू, वर्षा गायकवाड यांना दिली गुन्हेगारांची नावं ! त्यांच्या नावामार्फत फोन टँपिंग केल्याची माहिती उघड झाली आहे. गुन्हेगारांची नावं कोणी द्यायला लावली आणि का दिली? याचा तपास आता पुणे पोलिसांकडून केला जाणार आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर रश्मी शुक्लांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाली म्हणून ही कारवाई झाली असं बोललं जातं आहे. परंतु असं काही नाही. याबाबतचा अहवाल आला आणि त्यानंतर ही करवाई झाली आहे. सार्वजनिक सुरक्षे अंतर्गत सुरक्षेसाठी फोन टॅप करायची परवनगी दिली जाते. परंतु, या प्रकरणात फोन टॅप करण्याची कोणत्याही प्रकारची गरज नव्हती. त्यामुळें ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी फोन कशासाठी टॅप केलें हे लवकरच समोर येईल, असं दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितलं.
OBC Reservation | ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकणार का? सर्वोच्च न्यायालय आज काय निकाल देणार?
Yashwant Jadhav | यशवंत जाधव यांची इन्कम टॅक्स चौकशी चौथ्या दिवशी संपली