संजय राऊत यांच्याविरोधात नसरापूर ठाण्यात तक्रार; शिवसेनेतील शिंदे गट आक्रमक का?

| Updated on: Feb 21, 2023 | 8:36 AM

खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. या निषेधार्थ संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा भोर-वेल्हा शिवसेनेतर्फे आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा तक्रार अर्जात दिला आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात नसरापूर ठाण्यात तक्रार; शिवसेनेतील शिंदे गट आक्रमक का?
संजय राऊत
Follow us on

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी, राऊतांविरोधात पुण्यातील भोरच्या नसरापूर पोलीस स्टेशनंमध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे तालुकाप्रमुख गणेश मसुरकर यांनी तक्रार अर्ज दिला. संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी संजय राऊत यांनी अपशब्द वापरला. त्यामुळे शिंदे गट राज्यभर आक्रमक होताना दिसत आहे. पुण्यातील भोरच्या शिवसेनेच्या तालुकाप्रमुखांनी, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरूद्ध नसरापूरच्या राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा भोर तालुका शिवसेनेतर्फे आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा तक्रार अर्जाद्वारे देण्यात आलाय. शिवसेनेचे भोर तालुकाप्रमुख गणेश मसुरकर यांनी हा तक्रार अर्ज दिलाय.

शिवसेनेतर्फे आंदोलनाचा पावित्रा

शिवसेनेचे भोर तालुकाप्रमुख गणेश मसुरकर यांनी नसरापूर राजगड पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रार अर्जात म्हटले आहे की, खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. या निषेधार्थ संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा भोर-वेल्हा शिवसेनेतर्फे आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा तक्रार अर्जात दिला आहे.

काय आहे प्रकरण?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात अमित शाह यांनी यूपीए सरकार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवे चाटले, असं वक्तव्य शाह यांनी केले. या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.

नाशिकमध्ये राऊतांविरोधात गुन्हा

सध्याचे मुख्यमंत्री कुणाची चाटत आहेत. अशी चाटूगिरी राज्यात कधी झाली नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. या राऊत यांच्या आक्षेपार्ह विधानावर आता राज्यात संजय राऊत यांच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या जात आहेत. नाशिकमध्येही संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यात राऊत यांच्याविरोधात कलम ५०० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.