पुणे : राज्य सरकारच्या आरोग्य विभागासाठी आोयजित भरती प्रक्रियेत (ecruitment in Maharashtra) परीक्षेआधीच मोठा गोंधळ उडाला आहे. विद्यार्थ्यांना आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा असूनसुद्धा पुण्यातील विद्यार्थ्यांना गडचिरोली, विदर्भ तर विदर्भातील विद्यार्थ्यांना पुणे आणि मुंबई असे परीक्षा केंद्रं दिली गेली आहेत. यामुळे सध्याच्या कारोना संसर्गामध्ये तुलनेने दूरच्या परीक्षा केंद्रांपर्यंत कसे पोहोचावे?, असा प्रश्न परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना पडला आहे. तसेच तीन विविध पदांसाठी अर्ज केलेले असले तरी उमेदवारांना फक्त एकाच पदासाठी संधी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे परिक्षार्थींमध्ये नाराजी आहे. (confusion in the recruitment process in the health department, future of millions of students is in DENJOUR )
जानेवारी महिन्यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याचे जाहीर केले होते. त्यांनी जाहीर केल्यानुसार राज्यात आरोग्य विभागात एकूण 17 हजार पदांची भरती होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात यापैकी सुमारे 7 हजार पदांसाठी परीक्षा होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने परीक्षा प्रक्रियेसाठी महाआयटी या खासगी कंपनीला नेमलेलं आहे. या कंपनीकडून परीक्षेचा कार्यक्रम राबवला जातोय. 7 हजार पदांसाठी येत्या 28 फेब्रुवारीला परीक्षा होणार आहे. त्यासाठी इच्छुक उमेदवारांना आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आलेली आहे. मात्र, पुण्यातील विद्यार्थ्यांना गडचिरोली, विदर्भातील परीक्षा केंद्रं देण्यात आली आहेत. तर विदर्भातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई केंद्र अशी तुलनेने दूरची परीक्षा केंद्रं दिली गेली आहेत.
राज्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत एवढ्या दूर मिळालेल्या परीक्षा केंद्रांवर जाणे जिकरीचे असल्याची भावना उमेदवारांची आहे. तसेच, उमेदवारांनी तीन विविध पदांसाठी परीक्षा अर्ज भरलेले असताना, अनेक उमेदवारांना फक्त एकच संधी देण्यात आली आहे. या सर्व सावळ्या गोंधळामुळे इच्छुक उमेदवार गोंधळले आहेत. राज्यात एकूण 7 हजार जागांसाठी लाखो उमेदवारांची परीक्षा होणार आहे.
सामाजिक अधीक्षक (भौतिकशास्त्र), फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, व्यावसायिक थेरपिस्ट, ज्युनियर लिपिक, सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय), प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, नेत्र चिकित्सा अधिकारी, नॉन वैद्यकीय सहाय्यक, सांख्यिकीय अन्वेषक, रासायनिक सहाय्यक, बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट, ज्युनियर अभियंता, मीडिया मेकर, टेलिफोन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, कुशल कारागीर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, जेआर तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, फोरमॅन, सेवा अभियंता, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, शिक्षक, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, बालरोग परिचारिका, ग्रुहा वस्त्रपाल, लॅब टेक अधिकारी, लॅब वैज्ञानिक अधिकारी, लॅब सहाय्यक, एक्स -रे टेक्निशियन. ब्लड बँक वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट अधिकारी, डाएटिशियन, स्टाफ नर्स, ड्रायव्हर, प्लंबर, अभिलेखपाल, ज्युनियर क्लर्क, इलेक्ट्रीशियन, एएनएम, सीनियर क्लार्क, लॅब टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, ईसीजी टेक्निशियन, टेलर , रेकॉर्ड कीपर, हाऊस अँड लिनेन कीपर, स्टोअर व लिनन कीपर, एक्स-रे वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, डायलिसिस टेक्निशियन, शिंपी, नलकरगिरी, सुतार, डेंटल हायजीनिस्ट, वॉर्डन, अबलेखापाल, सुतार, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, टेलर, ईसीजी तंत्रज्ञ.
दरम्यान, या गोंधळाकडे राज्य सरकार तसेच भरती प्रक्रियेची घोषणा केलेल्या आरोग्यमंत्र्यांनी दखल लक्ष द्यावे, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.
इतर बातम्या :
तयारीला लागा, राजेश टोपेंकडून परीक्षेची तारीख जाहीर, आरोग्य विभागात 50 टक्के जागा भरणार