अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 30 जानेवारी 2024 : पुणे पोलिसांचा जुना प्लॅन आहे. गुन्हा दाखल करून मला मुद्दाम जेलमध्ये घालण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आयुक्तांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली. वेळ पडली तर त्यांची तक्रार मुख्यमंत्री महोदयांकडे करणार आहे. ललित पाटील प्रकरणात मी सगळं समोर आणत असलायने माझ्यावर पोलीस कारवाई करत आहेत. माझ्याकडून जी शिवीगाळ झाली तो कार्यकर्त्यांऱ्यांचा संताप आणि भावना होत्या. माझी वाढती लोकप्रियता आणि मी करत असणारि कामे बघून जाणूबुजून माझ्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. भाजपच्या आदेशाने माझ्यावर खोटे कलम लावत आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 महिन्यापासून हे लोक मला अडचणी निर्माण करत आहेत, असे गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी केले आहेत.
आपल्यावर मुद्दाम गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ललित पाटील प्रकरणात आवाज उठवल्याने कारवाई केली जात असल्याचा आरोप धंगेकर यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाय. काल माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या कर्मचारी संघाने माझ्या विरोधात निषेध सभा घेतली आहे. मुळात इथं सभा घेता येत नाही, अस एक पत्र जिल्हा आधिकारी यांनी यापूर्वीच काढलं आहे. या आवारात महाराजांचा पुतळा आहे,म्हणून तिथं कुठल्याही राजकीय पक्षाला तिथं कुठलेच राजकीय कार्यक्रम घेता येत नाहीत. त्या जागेत कुठलीही सभा,कुठलाही मोर्चा आणि आंदोलन त्या ठिकाणी घेता येत नाहीत. काल जे निषेध आंदोलन झालं हे चुकीचं झालं आहे. बेकायदेशीर आहे, असंही धंगेकर म्हणालेत.
महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. त्यांनीय कुठलीही परवानगी घेतली नाही. काल झालेली नियमबाह्य सभा होती. पाण्याच्या टाकीच उद्घाटन करण्यासाठी सगळ्या पक्षाच्या नेत्याने बोलवण्याचा ठराव झाला होता. तरी पालिकेतील अधिकारी जगताप यांनी परवानगी न घेता कार्यक्रम घेतला होता. भाजप आमदार यांच्या दवबाव खाली येऊन कार्यकम घेतला. तो कार्यक्रम भाजपमय होता. अधिकारी भाजपमय झाले होते. त्यांनी मला मुद्दाम अडवलं. आमच्या नेत्यांना मारहाण केली आहे. अधिकारी भाजपचे हस्तक झाले आहेत, असा दावा रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.
353 कलम लावणं चुकीचं, मी लोकप्रतिनिधी मला अडवू शकत नाहीत. मला खेद वाटत नाही. पोलिसांनी भाजपच्या सांगण्यावरून कलम लावली आहेत. आधी गुन्हा दाखल झाला मी आमदार झालो. आता परत गुन्हा दाखल झाला आहे परत बघू काय होतं. महापालिकेत कामे होत नाहीत ही परिस्थिती आहे. पोलीस हे भाजपच्या ताटा खालचे मांजर झाले आहेत, असाही आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.