पुणे : राज्यभरातून हजारो आदिवासी जमातीतील विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येतात. मात्र त्या विद्यार्थ्यांना राहण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून वसतीगृहाची मागणी केली जात होती. या मागणीची आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दखल घेतली आहे. यानुसार त्यांनी पुण्यातील हडपसर भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाने या वसतीगृह इमारत बांधकामाच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. (Construction of a hostel for tribal students in Pune)
पुण्यात शैक्षणिक सोयीसुविधा असल्यामुळे राज्यभरातील विविध विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत असतात. त्याचप्रमाणे राज्यातील आदिवासी जमातीतील विद्यार्थी हे पुण्यातील विविध शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेतात. मात्र, प्रवेशानंतर अशा विद्यार्थ्यांना राहण्याची सोय होत नाही. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. अशा विद्यार्थ्यांनी वसतीगृह उभारण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची पूर्तता करण्याच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागाने पावले उचलली आहेत.
पुण्यातील राहण्याची गैरसोय दूर करण्यासाठी हडपसर भागातील मौजे महंमदवाडी येथे आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहाची इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी 44 कोटी 85 लाख अंदाजे खर्च येणार आहे. नुकतंच याबाबतचा आराखडा सादर करण्यात आला होता. या अंदाजपत्रकास आदिवासी विभागाने प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
आदिवासी मुलांच्या वसतीगृहाची इमारत नऊ मजली असणार आहे. यामध्ये इयत्ता आठवी ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या सुमारे साडेसहाशे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या वसतीगृहाचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुण्यात येणाऱ्या आदिवासी मुलांसाठी ही एक चांगली सोय होणार आहे. यामुळे त्यांच्या राहण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देता येईल. (Construction of a hostel for tribal students in Pune)
Video : Shrikant Shinde | शहर, रस्ते सुशोभिकरणासाठी करण्यासाठी 100 कोटीचा प्रस्ताव तयार : श्रीकांत शिंदे@DrSEShinde pic.twitter.com/nP0MpY356H
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2021
संबंधित बातम्या :
सिमला, मनालीच्या धर्तीवर महाबळेश्वरचा विकास, 33 कोटींचा निधी मंजूर