Coroanvirus Pune: पुण्यात महानगरपालिका व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देणार

| Updated on: Jul 03, 2021 | 8:19 AM

Coronavirus in Pune | कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागल्यामुळे पुण्यातील जम्बो कोविड सेंटर अखेर बंद करण्यात आले आहे. जम्बोमधील रुग्ण कमी झाल्यानंतर 1 जून रोजी रुग्णालयातील 300 ऑक्सिजन खाटा कमी करण्यात आल्या होत्या.

Coroanvirus Pune: पुण्यात महानगरपालिका व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देणार
कोरोना लसीकरण
Follow us on

पुणे: आगामी काळात कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरण्याची शक्यता असलेल्या व्यापाऱ्यांना दुकानात जाऊन लस देण्याची योजना महानगरपालिकेने आखली आहे. महापालिकेच्या वतीने लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्‍यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहिम गुरुवारपासून लसीच्या (Coronavirus Vaccine) उपलब्धतेनुसार राबविली जाईल, अशी माहिती पालिकेच्यावतीने देण्यात आली. याशिवाय सध्या पुणे महानगरपालिकेकडून दिव्यांग, रस्त्यांवरील नागरिक, झोपडपट्ट्यांमधील नागरिकांचे लसीकरण सुरु असल्याचेही अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. (Covid vaccination drive for Pune Traders and shopkeeprs)

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर अखेर बंद

कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागल्यामुळे पुण्यातील जम्बो कोविड सेंटर अखेर बंद करण्यात आले आहे. जम्बोमधील रुग्ण कमी झाल्यानंतर 1 जून रोजी रुग्णालयातील 300 ऑक्सिजन खाटा कमी करण्यात आल्या होत्या. पहिली लाट ओसरल्यानंतर जम्बो रुग्णालय 15 जानेवारी रोजी बंद करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेमुळे 22 मार्चपासून जम्बो कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात आले होते. दुसऱ्या लाटेत 22 मार्च ते 1 जुलै दरम्यान एकूण ३००९ रुग्ण जम्बोमध्ये दाखल झाले होते.

मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल 7473 लहान मुलं बाधित, एकाचा मृत्यू

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट थोपवल्यानंतर आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत दिले जात आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत 0 ते 9 वर्षापर्यंतच्या तब्बल 7473 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. तसेच यात एका मुलाचा दुर्दवाने मृत्यूही झाला आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईत 0 ते 9 वर्षापर्यंतच्या तब्बल 7473 लहान मुलं बाधित झाली आहेत. ही सर्व मुलं साधारण फेब्रुवारीच्या मध्यानंतर 19 फेब्रुवारी ते 1 जून 2021 या कालावधीत कोरोनाग्रस्त झाली आहेत. तर गेल्यावर्षी मार्चपासून आतापर्यंत 12845 मुलांना कोरोनाची लागण झाली. यात 55 टक्के मुले तर 45 टक्के मुली कोरोनाबाधित झाल्या आहेत.

तसेच गेल्या दीड वर्षाच्या कोरोनाकाळात 10 ते 19 वर्षे वयोगटातील एकूण 32 हजार 854 जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये 56 टक्के मुलं तर 44 टक्के मुली बाधित झाल्या आहेत. तर या वयोगटातील एकूण 40 मुलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात पहिल्या लाटेत 31 आणि दुसऱ्या लाटेत 9 जणांचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या : 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्ययंत्रणा बळकट करा, अजित पवारांचे निर्देश

Coroanvirus: मुंबईत 90 लाखांच्या टार्गेटपैकी 44 लाख नागरिकांचं लसीकरण संपन्न: आदित्य ठाकरे

Mumbai Corona | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल 7473 लहान मुलं बाधित, एकाचा मृत्यू

(Covid vaccination drive for Pune Traders and shopkeeprs)