पुणे – युरोपीय देशात कोरोनाच्या पुन्हा उद्रेक होताना दिसून येत आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचा आरोग्य विभागही अलर्ट मोडवर आला आहे. कोरोनामुळे (Corona ) सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्याने येऊ घातलेल्या या कोरोनाच्या लाटेमुळे पुन्हा एकदा सर्वजण सतर्क झाले आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक घेणार आहेत. यामुळे मागील काही दिवसांपासून बंद झालेल्या कोरोनाच्या बैठकी पुन्हा सुरु होणार आहेत. राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास (State Health Secretary Pradip Vyas) यांनीही सर्वांना अलर्ट (alert) राहण्याच्या सूचना दिल्या आलेल्या आहेत. येत्या शुक्रवार (25 मार्च ) पासून पुन्हा कोरोना बाबतच्या आढावा बैठकीला सुरुवात होणार आहे. याबरोबरच भारतात कोरोनाची चौथी लाट येणार का? या लाटेचा नेमका किती परिणाम होणार आहे याबाबतचीशक्यता आय एम ए चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी नुकतीच दिली आहे.
भारत व महाराष्ट्रात साधारण नोव्हेंबर 2021 फेब्रुवारी 2022पर्यत आधी ओमायक्रोन बी ए 1 व बी ए 2 या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटचे रुग्ण सगळीकडं आढळत होते. या रुग्णांना फारशी बाधा होत नाही बी 2 हा बी1 सारखाच विषाणू आहे, हा विषाणू फार वेगाने पसरतो. मात्र यामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही . साधारण 70 च्या पुढच्या वयोगटातील लोकांना याचा धोका संभवतो. त्यातही ज्या लोकांचे लसीकरण झाले नाही. त्यांना याची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या विषाणुचा धोका या टाळण्यासाठी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. याबरोबच शहरातील रुग्णालयातील सुविधा सज्ज ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. लसीकरण वेगाने होणे आवश्यक असल्याची माहिती डॉ. भोंडवे यांनी दिली आहे.
जरी कोरोनाचा नवीन विषाणू आला तरी तो फारसा वेगाने पसरणारा नाही. अशी शक्यता आहेत . मात्र हा विषाणू पसरू नये यासाठीची काळजी आपण घ्यायलाच हवी असे मत डॉ अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे. चीन आणि इतर युरोपीय देशातील वाढती रुग्णसंख्या पाहता चौथी लाट येण्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे. जगामधील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आठ टक्क्यांनी वाढली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चीन या हाँगकाँग , दक्षिण कोरिया या देशांमध्ये ही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. अमेरिकेतही रुग्णसंख्या वाढली आहे. युरोपीय देशांमध्ये जर्मनी जपान येथेही कोरोना रुग्ण वाढत आहेत.