पुणे: संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. तर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीकरण मोहिमेची सुरुवात केली आहे. या लसीकरणाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांना ही लस दिली जाणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानं संयुक्तरित्या निर्मी केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या लसींचा यात समावेश आहे. या लसीकरण मोहिमेच्या सुरुवातीला सिरम इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनीही आज लस टोचून घेतली आहे.(Adar Punawala of Siram Institute vaccinated himself)
भारतीय बनावटीच्या लसींबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. तसंच अनेक अफवाही पसवल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना विश्वास देताना भारतीय बनावटीची लस विश्वासार्ह असल्याचं सांगितलं. तसंच लसींबाबत कुठल्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहनही मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आज ‘सिरम’चे अदर पुनावाला यांनी स्वत: लस टोचून घेतली आहे. तशी माहिती त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे दिली आहे.
“लसीकरण मोहिमेबद्दल मी देशवासियांचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात पार पडत आहे. कोव्हीशिल्डच्या यशामागं अनेकांची मेहनत आहे. या यशाचा मला अभिमान वाटतो. ही लस सुरक्षित आणि परिणामकारक आहे. हा संदेश आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी लस घेत आहे”, असं ट्वीट पुनावाला यांनी केलं आहे.
I wish India & Sri @narendramodi ji great success in launching the world’s largest COVID vaccination roll-out. It brings me great pride that #COVISHIELD is part of this historic effort & to endorse it’s safety & efficacy, I join our health workers in taking the vaccine myself. pic.twitter.com/X7sNxjQBN6
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 16, 2021
कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीसाठी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अविरतपणे संशोधन सुरु होतं. तसंच या लसीच्या तिनही मानवी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतर या लसीच्या आपत्कालिन वापरासाठी केंद्र सरकारनं मंजुरी दिली. ही लस सुरक्षित असल्याचा संदेश देत अदर पुनावाला यांनी स्वत: ही लस घेतली आहे.
“लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच आपण 3 कोटी आरोग्य सेवकांना लस देणार आहोत. दुसऱ्या टप्प्यात आलल्याला ही मोहीम 30 कोटी लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. दुसऱ्या टप्प्यात वृद्ध नागरिकांना आणि फ्रन्ट लाईन कामगारांना लस दिली जाणार आहे. भारताची लसीकरण मोहीम खूप मोठी आहे. त्यामुळे ही मोहीम म्हणजे भारताच्या सामर्थ्याचं दर्शन म्हणावं लागेल. आपले शास्त्रज्ञांनी भारतीय बनावटीच्या दोन्ही लसीबाबत खात्री पटल्यानंतरच लसीच्या आपत्कालीन वापसाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी पडू नका. जगभरातील 60 टक्के बालकांना ज्या लस दिल्या जातात. त्याची निर्मिती ही भारतातच होते. त्यामुळे भारतीय बनावटीच्या कोरोना प्रतिबंधक लसही विश्वासार्ह आहे”, असं पंतप्रधान मोदी यांनी आवर्जुन सांगितलं.
संबंधित बातम्या :
Corona vaccination : कोरोनाचं संकट टळलेलं नाही, त्रिसूत्रीचं पालन करा; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
लसीकरणाच्या मुद्द्यावर राजकारण नको; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
Adar Punawala of Siram Institute vaccinated himself