पुणेकरांनी खासगी लसीकरण केंद्राकडे फिरवली पाठ

| Updated on: Aug 10, 2021 | 8:06 AM

Covid Vaccine | या माध्यमातून लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रशासनाचा विचार असून त्या बदल्यात खासगी दवाखान्यांना नव्या लसींचा साठा पुरवण्यात येईल. अन्यथा या लसींची एक्सपायरी डेट संपून हे डोस वाया जाण्याची भीती आहे.

पुणेकरांनी खासगी लसीकरण केंद्राकडे फिरवली पाठ
कोरोना लसीकरण.
Follow us on

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांनी जिल्ह्यातील खासगी लसीकरण केंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे. खासगी लसीकरण केंद्रात 4 लाख 61 हजार लसींचा साठा पडून आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खासगी दवाखान्यांकडे उपलब्ध असलेला लसींचा साठा जिल्हा प्रशासन उधारीवर घेणार आहे.

या माध्यमातून लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रशासनाचा विचार असून त्या बदल्यात खासगी दवाखान्यांना नव्या लसींचा साठा पुरवण्यात येईल. अन्यथा या लसींची एक्सपायरी डेट संपून हे डोस वाया जाण्याची भीती आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने ही अभिनव संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. खासगी दवाखान्यांना शासनाला लस द्यायची असल्यास कोरेगाव पार्क येथील लस साठवण केंद्राशी किंवा जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. सचिन एडके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचडवमध्ये फक्त 59 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ची लस

पिंपरी चिंचवड महापालिकेला ‘कोविशिल्ड’ची लसींचा साठा उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना आज फक्त ‘कोव्हॅक्सिन’चा अनुक्रमे पहिला व दुसरा डोस मिळेल. किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या, ऑनलाइन पद्धतीने बुकिंग केलेल्या आणि कोविन ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप नोंदणीद्वारे लाभार्थ्यांचे लसीकरण आज पार पडेल.

गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाच्या 4405 नव्या रुग्णांची नोंद

मुंबईत सोमवारी दिवसभरात कोरोनाचे 208 रुग्ण सापडले होते. दुसऱ्या लाटेतील ही सर्वाधिक कमी रुग्णसंख्या आहे. यापूर्वी 26 जुलैला 299 तर 20 जुलैला मुंबईत 351 रुग्ण सापडले होते. तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्याही पाच हजारांच्या खाली आली. काल दिवसभरात राज्यात 4405 रुग्ण सापडले. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर पोहोचले आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1680 दिवसांवर पोहोचला आहे.

संबंधित बातम्या:

पुण्यात पुन्हा लसींचा तुटवडा, दोन दिवस लसीकरण बंद ठेवण्याची वेळ

Coronavirus: पुण्यातील 607 गावांमध्ये आठवडाभरात एकही रुग्ण नाही, 42 गावांमध्ये हायरिस्क अलर्ट