पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक (cyber attack) झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. विशेष म्हणजे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation Smart City project) सर्व्हरवर सायबर हल्ला केल्यानंतर सव्हर्वरमधील डाटा इन्क्रिप्ट करण्यात आला आहे. हा डेटा परत हवा असल्याच पैशांची मागणी करण्यात आलीये. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला असून पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. (cyber attack on the server of Pimpri Chinchwad Municipal Corporation Smart City project cyber attacker demands bitcoin)
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्मार्टसिटी उपक्रमांतर्गत डाटा सेंटर उभारणीचं काम खासगी संस्थांना देण्यात आले आहे. मात्र हे काम चालू असताना परदेशातून सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आल्याचे उघड झाले. तसेच या सायबर हल्ल्यामध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरमधील सर्व डाटा इन्क्रिप्ट करण्यात आलाय. विशेष म्हणजेच इन्क्रिप्ट केलेला परत घेण्यासाठी अज्ञाताने पैशांची मागणी केली आहे. ही रक्कम बिटकॉईनच्या स्वरूपात देण्याची अटही अज्ञाताने घातली आहे.
सायबर हल्ल्याची पुण्यातील ही पहिलीच घटना नाही. याआधी पुण्यातील कॉसमॉस बॅंकेवर 11 आणि 13 ऑगस्ट 2018 रोजी सायबर हल्ला झाला होता. या प्रकरणी प्रमुख आरोपीला यूएई पोलिसांनी 6 मार्च रोजी अटक केली होती. या हल्ल्यात तब्बल 94 कोटी रुपये लुटण्यात आले होते. या प्रकरणातील तीन प्रमुख आरोपींपैकी एकाला यूएईमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. 28 वर्षीय आरोपी सुमेर शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
12 ऑक्टोबर 2020 मध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बहुतांश भागात अचानक वीज गेली होती. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने त्याचा परिणाम मुंबईच्या लोकलवरही झाला होता. मात्र, मुंबईची बत्ती गुल करण्यामागे चीनचा हात असल्याचे समोर आले आहे. त्याला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांनीही दुजोरा दिला होता. त्यानंतर आता पिंपरी चिंचवड माहापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यामागे नेमकं कोण आहे, याची अधिकृत माहिती अद्याप समजलेली नाही. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली असून पोलीस कसून चौकशी करत आहेत.
इतर बातम्या :