सोलापूर: सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्ह्यात आजपासून 7 मार्चपर्यंत कडक रात्र संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती दिली. आज (24 फेब्रुवारी) मध्यरात्रीपासून रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी लागू असेल. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शहर आणि जिल्ह्यातील टेस्टींग वाढवणार असल्याचंही त्यांनी सांगितले. तर लग्नकार्यासाठी केवळ 50 व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलीय. कर्नाटकातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना टेस्ट अनिवार्य करण्यात आली असून ज्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असेल त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. (Dattatray Bharane said corona negative test report is compulsory for them who came from Karnataka )
जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालय 7 मार्चपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती भरणे यांनी दिली. तर, 10 वी आणि 12 चे वर्ग सुरु राहणार आहेत. क्रिडांगणावर 7 मार्चपर्यंत कोणत्याही क्रीडा स्पर्धा भरवण्यास बंदी घालण्यात आली आहे. लग्नसमारंभासाठी 50 लोकांची मर्यादा घालण्यात आल्याचही त्यांनी सांगितले.
वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर टेस्टिंग वाढवण्याच्या सूचना दत्ता भरणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. कोव्हिड केअर सेंटर, डेडीकेटेड कोव्हिड सेंटर वाढविणार असल्याचंही ते म्हणाले. कर्नाटकातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 57405 वर पोहोचली आहे. तर, 54786 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1838 वर पोहोचलीय. सोलापूरमध्ये सध्या 732 सक्रिया कोरोना रुग्ण आहेत.
दरम्यान, राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढल्याचं चित्र आहे. मंगळारी राज्यात 6218 कोरोना रुग्ण आढळले तर 5869 जण कोरोनामुक्त झाले. राज्यातील बुलडाणा, यवतमाळ आणि वाशिममध्ये मिनी लॉकडाऊन लावण्यात आलेय. तर, दुसरीकडे वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात आठवडी बाजार, शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिलेत.
सर्वसामान्यांना लुबाडणारे लॉकडाऊन शासनाने करु नये, शेतकरी सुकाणू समितीची मागणीhttps://t.co/6QzC2Ei7Ek#Maharashtra #Corona #CoronaUpdate #Lockdown
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
संबंधित बातम्या :
‘ओ काका आमचा एक फोटो काढा की’…म्हणत विनंती, अन् मंत्री झाले फोटोग्राफर
एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्डच्या कोरोना लसीच्या वैद्यकीय चाचणीचा अहवाल समोर, कोणती लस जास्त प्रभावी?
(Dattatray Bharane said corona negative test report is compulsory for them who came from Karnataka )