Indapur : हर्षवर्धन पाटील हे लबाड आणि लफंगे, त्यांना जवळही येऊ देऊ नका; दत्तात्रय भरणेंची जहरी टीका

| Updated on: Apr 17, 2022 | 2:01 PM

हर्षवर्धन पाटील (Harshavardhan Patil) 'लबाड आणि लफंगे असल्याची जहरी टीका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली आहे. इंदापूर (Indapur) तालुक्यातील डाळज नं. 2 या गावी विविध विकास कामांचे भूमिपूजन भरणे यांच्याहस्ते झाले, त्यावेळी त्यांनी टीका केली.

Indapur : हर्षवर्धन पाटील हे लबाड आणि लफंगे, त्यांना जवळही येऊ देऊ नका; दत्तात्रय भरणेंची जहरी टीका
इंदापुरातील सभेत बोलताना दत्तात्रय भरणे
Image Credit source: tv9
Follow us on

इंदापूर : हर्षवर्धन पाटील (Harshavardhan Patil) लबाड आणि लफंगे असल्याची जहरी टीका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली आहे. माजी मंत्री पाटील आता काहीच कामाचे राहिले नाहीत, एक रुपयाचादेखील ते विकास करू शकत नाहीत. लोकांची दिशाभूल, फसवणूक करणे एवढेच आता त्यांचे काम राहिले असल्याची टीका त्यांनी केली आहे. इंदापूर (Indapur) तालुक्यातील डाळज नं. 2 या गावी विविध विकास कामांचे भूमिपूजन भरणे यांच्याहस्ते झाले, त्यावेळी त्यांनी टीका केली. भरणे यांच्या उपस्थितीत 16 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन यावेळी झाले. भर सभेत बोलताना भरणे यांनी माजी हर्षवर्धन पाटील त्यांच्यापासून लोकांनी सावधान राहिले पाहिजे, असे म्हटले आहे.

‘आता यांनाही दारात फिरावे लागत आहे’

पुढे ते म्हणाले, की गेली 19 वर्ष (हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता) हे लोक मंत्रिमंडळात होते. मंत्री म्हणून त्यांनी 19 वर्षे काम केले आहे, मात्र हे या एकोणीस वर्षात इंदापूर तालुक्याच्या लोकांच्या सुख-दुःखात कधी सहभागी झाले नाही. आता मी आमदार व राज्यमंत्री झाल्यानंतर स्वतः लोकांच्या घरी जाऊन सुखदुःखात भेटी घेत आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता लोकांच्या दारात गेल्यामुळे आता यांनाही (हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता) लोकांच्या दारात जावे लागत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

‘आधीही नाही, आत्ताही त्यांना काहीच काम नाही’

त्यांना आता काहीच काम राहिले नाही. त्यांनी या अगोदरही काहीच कामे केली नाहीत. हे आता एक रुपयांचीदेखील लोकांना मदत करू शकत नाहीत. कसलाही विकास करू शकत नाहीत. फक्त गप्पा मारणे, लोकांची फसवणूक करणे, त्यांची दिशाभूल करणे, आपल्यातील कोण दुखावले तर त्याच्या जवळ जातील. मात्र अशा लबाड व लफंग्यांपासून सावधान राहा, असे भरणे म्हणाले.

आणखी वाचा :

Navneet Rana | राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंची जागा घेणार, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं मोठं विधान

Raj Thackeray : देशातील हिंदूंनो तयार राहा, 3 तारखेपर्यंत त्यांना कळलं नाही तर जशास तसे उत्तर देऊ; राज ठाकरे पुन्हा आक्रमक

Ajit Pawar On James Laine : तुम्ही कारण नसताना कोणत्याही पावत्या माझ्या नावावर फाडू नका; जेम्स लेन प्रकरणावर अजित पवार नेमकं काय म्हणाले?