पुणे : पुण्यात दोन दिवसांचा मुक्काम केल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे (Palkhi) आता पुढील मार्गासाठी प्रस्थान झाले आहे. आज सकाळी पालख्यांचे पुण्यातून प्रस्थान झाले असून, संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी हडपसर मार्ग दिवे घाट (Dive Ghat) सर करून सासवड येथे मुक्कामी असणार आहे. तर संत तुकाराम महाराज यांची पालखी हडपसरमार्गे मांजरी करत लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथे मुक्कामी असणार आहे. दोन वर्षानंतर पायी वारी सोहळा सुरू झाल्यानंतर लाखो वारकरी दोन्ही पालख्यांमध्ये सहभागी झालेले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज दिवे घाटातील अवघड वाट सर करणार आहे. तर दुसरीकडे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी लोणीमार्गे पंढरीकडे प्रस्थान करीत आहे.
दोन दिवस पुणे मुक्कामी असलेल्या पालख्यांनी पुणे गजबजले होते. आळंदी, देहूतील वैष्णवांचा मेळा पुणे मुक्कामानंतर आता पंढरीच्या दिशेन मार्गस्थ झाला आहे. याच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या चोरट्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी केले आहे. पालखी सोहळाला मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झालेले असताना याच गर्दीचा फायदा घेऊन अनेक भुरट्या चोरट्यांनी सोनसाखळी, पाकिटावर डल्ला मारला आहे. या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी गुन्हे शाखा, स्थानिक पोलिसांची पथक नेमण्यात आली. त्यामध्ये काही पोलीस अधिकारी, कर्मचारी हे वारकरी वेशभूषा करून
पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी विविध पथके, कर्मचारी आणि अधिकारी गस्त घालत होते. सीसीटीव्हीदेखील अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. यावेळी गस्त घालत असताना अनेक संशयित त्यांच्या नजरेस पडले. जवळपास 225 संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी 60 जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून साडेपाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पालखी सोहळ्यातील गुन्हेगारांना ओळखण्यासाठी काही व्यक्तींना त्या-त्या जिल्ह्यातून आणले होते.