मोठी बातमी : खुद्द पोलीस महासंचालक मैदानात, हेमंत नगराळे पूजा चव्हाण केसची माहिती घेण्यासाठी पुण्यात

| Updated on: Feb 16, 2021 | 12:33 PM

खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहती घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. | Hemant Nagrale Visit Pune

मोठी बातमी : खुद्द पोलीस महासंचालक मैदानात, हेमंत नगराळे पूजा चव्हाण केसची माहिती घेण्यासाठी पुण्यात
पोलिस महासंचालक हेमंत नगराळे
Follow us on

पुणे :   खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे आता पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहती घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. याअगोदर हेमंत नगराळे यांनी मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. (DGP Hemant Nagrale Visit Pune Over Pooja Chavan Suicide Case)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांच्या आदेशानुसार आता हेमंत नगराळे पुण्यातल्या घटनास्थळी जाऊन या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेणार आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास पुणे पोलिस करत आहेत. त्यांच्याकडून नगराळे या प्रकरणाची डिटेल माहिती घेतील.

पुणे पोलिसांकडून पोलिस महासंचालकांना प्राथमिक रिपोर्ट सादर

पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा प्राथमिक रिपोर्ट राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना सादर केला होता. त्यानंतर ते आता पुण्यात आल्याने त्यांचा हा पुणे दौरा विशेष महत्त्वाचा मानला जातोय.

पुणे पोलिसांचं पथक यवतमाळला

पुणे पोलिसांचं पथक देखील यवतमाळला गेलं आहे. तिथे जाऊन ते या घटनेचे आणखी काही धागेदोरे मिळतायेत का? याची झाडाझडती घेत आहे. शासकिय पातळीवरुन देखील या प्रकरणाच्या चौकशीसाठी वारंवार विचारणा होत असल्याने पुणे पोलिस वेगाने सूत्रं फिरवत आहेत.

संजय राठोड यांचा राजीनामा, सुत्रांची माहिती

जा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मंगळवारी सकाळी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा स्वीकारणार का? आता मुख्यमंत्री हा राजीनामा राज्यपालांकडे पाठवतील का?, पाहावे लागणार आहे

कोण आहेत हेमंत नगराळे?

हेमंत नगराळे यांची याच वर्षाच्या सुरुवातीला राज्याच्या पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली.
सुबोधकुमार जैस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झाल्याने, त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची वर्णी लागली.
हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.
हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता.
त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली.

(DGP Hemant Nagrale Visit Pune Over Pooja Chavan Suicide Case)

हे ही वाचा :

मोठी बातमी: अखेर संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला, सूत्रांची माहिती

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : अरुण राठोडनेच स्थानिकांपर्यंत ऑडिओ क्लिप पोहोचवल्या

मोठी बातमी: संजय राठोड राजीनामा देण्याची दाट शक्यता; शिवसेनेत दोन गट