खेड, पुणे : केंद्र सरकारमध्ये (Central Government) केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा पाठिंबा आहे. मात्र केंद्राचा सध्याचा कारभार पाहता कधीही बाबासाहेबांची घटना बदलली जाईल. त्यामुळे रामदास आठवले स्वत:च्या फायद्यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरू नका. समाजाचा बळी देऊ नका. यातून समाजाचा फायदा होणार नाही. झाला तर फक्त रामदास आठवलेंचाच फायदा होईल, असे वक्तव्य आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी केले. राजगुरूनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. रामदास आठवले यांनी भाजपाशी जवळीक साधल्याच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. घटना बदलण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
पुढे ते म्हणाले, की केंद्र सरकारकडून भाजपाच्या लोकांना एक न्याय आणि राज्यातील नेत्यांना वेगळा आहे. इतरांना वेगळ्या प्रकारची वागणूक दिली जाते. मागील काही काळापासून असा प्रकारत राज्यात सुरू आहे. त्यामुळे आता बाबासाहेबांनी तयार केलेली घटनासुद्धा बदलायला किंवा दुरुस्त करायला ते मागेपुढे पाहाणार नाहीत, अशा भिती आमदार मोहिते पाटलांनी व्यक्त केली.
#Pune : रामदास आठवले, स्वत:च्या फायद्यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरू नका, यातून समाजाचा नाही, फक्त तुमचाच फायदा होईल, अशी टीका आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केले.@RamdasAthawale #dilipmohitepatil #ramdasathwale #politics
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/XSO570cM7K— TV9 Marathi (@TV9Marathi) April 14, 2022
मागच्या पाच वर्षात तुम्ही केंद्रात राज्यमंत्री झालात, त्याव्यतिरिक्त काय साध्य झाले, असा सवाल त्यांनी केला. केवळ स्वत:चा फायदा करून घेतला. समाजाला काय उपयोग झाला, असे मोहिते पाटलांनी यावेळी विचारले.