पुणे – कोरोनाच्या महारामारीनंतर महाराष्ट्रातील जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे. साहजिकच गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेले ऑनलाईन शिक्षण(online Education) बंद होत आता पुन्हा शाळा गजबजू लागल्या आहेत. यंदा शाळेत आपल्या पाल्यास प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची धावपळ सुरु आहे. राज्यात शिक्षक हक्क कायद्यानुसार (आरटीई ) इंग्रजी माध्यमांच्या (English Medium) शाळांमध्ये आपल्यापलाल्याला शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. या पालकांसाठी दिलासा देणारी माहितीसमोर आली आहे. येत्या 4 एप्रिलला या आरटीईटीतून(RTE) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 4 एप्रिल दुपारी 4नंतर विद्यार्थ्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची नावेही यावेळी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
शिक्षक हक्क कायद्यानुसार दरवर्षी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 25 टक्के आरक्षित जागांवर ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यासाठी केलेल्या अर्जांची संगणकीय पद्धतीनं लॉटरी काढली जाते. राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर,उपसंचालक राजेंद्र क्षीरसागर,पुणे जिल्ह्याच्या प्राथमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी संध्या गायकवाड,पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत,सहायक संचालक मीना शेंडकर,गीता जोशी, वैशाली पांढरे यांच्या उपस्थितीत ही लॉटरी काढण्यात आली.
यंदा आरटीई प्रवेशासाठे राज्यातील तब्बल2 लाख 82 हजार 778 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील पुणे जिल्ह्यातील 15 हजार 131 जागांसाठी 62 हजार 956 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक अर्ज प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावं लागणार आहे.
GT vs DC Live Score, IPL 2022: पहिल्याच षटकात दिल्लीने दिला झटका, मॅथ्यू वेड तंबूत