Ujani Dam : मुसळधार पावसामुळे आता उजनी धरणही लवकरच भरणार, एकूण पाणीसाठा 106.36 टीएमसीवर!

| Updated on: Aug 02, 2022 | 3:24 PM

11 जुलैच्या आसपास धरणातील पाणीसाठा उणे होता. त्यावेळी धरणात 60. 05 टीएमसी एवढा मृत पाणीसाठा होता तर धरण मायनस 6.73 टक्क्यांवर होते. मात्र पुणे जिल्ह्यातील धरण साखळीत मागील काही दिवसात मोठा पाऊस झाल्याने या भागातील धरणे भरली.

Ujani Dam : मुसळधार पावसामुळे आता उजनी धरणही लवकरच भरणार, एकूण पाणीसाठा 106.36 टीएमसीवर!
उजनी धरण
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यास वरदान ठरलेल्या उजनी धरणाची (Ujani Dam) पाणीपातळी वाढत आहे. सध्या पाणी पातळीच्या 80 टक्क्यांचा टप्पा ओलांडला गेला आहे. यामध्ये एकूण पाणीसाठा 106.36 टीएमसी झाला आहे. अजूनही दौंडमधून तीन हजारपेक्षा जास्त क्युसेक (Cusec) विसर्गाने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे लवकरच उजनी शंभरी गाठेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. यामुळे शेतकरी वर्गातूनदेखील समाधान व्यक्त होत आहे. जुलै महिन्याच्या 11 तारखेला उजनी धरणाचा पाणीसाठा हा उणे होता. मात्र सोलापूरसह पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) धरणाची वाटचाल आता शंभर टक्क्यांकडे सुरू झाली आहे. उजनी धरणामुळे पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात ऊसाचे कारखाने आहेत. सोलापूर जिल्ह्यात तर याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे एकूणच पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या शुभवार्तेने शेतकरी आनंदून गेला आहे.

ऊसपीकास फायदा

उजनी धरणामुळे पुण्यासह सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी खरीप पिकांकडे त्यातही ऊसाच्या पीकाकडे वळला आहे. उजणीच्या क्षेत्रात यंदा सर्वाधिक ऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागणाऱ्या पुणे-सोलापूरच्या या पट्ट्यात पाणीदेखीव टँकरने घेण्याची वेळ अनेकवेळा आली. यंदा मात्र सुखावणारा पाऊस आहे. तर धरणही शंभरीकडे (साठा) मार्गक्रमण करत आहे. यामुळे बागायतीचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रब्बी पिकांना प्राधान्य देणारा शेतकरी खरीपाकडे वळला ते या धरणामुळे… त्यामुळे आता केवळ 20 टक्क्यांच्या आसपास धरण भरणे बाकी आहे.

हे सुद्धा वाचा

अतिरिक्त पाणीसाठा सोडण्यात आला

जुलै महिन्याच्या सुरुवातीला साधारणपणे 11 जुलैच्या आसपास धरणातील पाणीसाठा उणे होता. त्यावेळी धरणात 60. 05 टीएमसी एवढा मृत पाणीसाठा होता तर धरण मायनस 6.73 टक्क्यांवर होते. मात्र पुणे जिल्ह्यातील धरण साखळीत मागील काही दिवसात मोठा पाऊस झाल्याने या भागातील धरणे भरली. त्यानंतर धरणातील अतिरिक्त पाणीसाठा सोडण्यात आला. भीमा नदीच्या मार्फत हा पाणीसाठा वाहत उजनी धरणात येतो. याच कारणाने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. तर पाऊसही अजून कमी झालेला असला तरी थांबलेला नाही. अधूनमधून तो बरसत असल्याने लवकरच धरण आता भरणार आहे.