पुणे – आगामी महानगरपालिका निवडणुकांचे (Election) वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. महापालिकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यांनंतर राजकीय नेते कामाला लागले आहेत. या प्रारूप प्रभाग रचनेच्या आराखड्यांच्या प्रसिद्धीनंतर त्यावर हरकती तसेच सूचना नोंदवण्यासही सांगण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत पुणे महापालिकेच्या( Pune Municipal Corporation) प्रभागांसाठी 3 हजार 596 हरकती प्राप्त झालेल्या आहेत. लवकर या हरकतींवर सुनावणी केली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियमावली घालून दिली आहे. नोंदवण्यात आलेल्या हरकती व सुचंनावर सुनावणी करताना त्याचे वरागीकरण केले जाणार आहे. त्यानुसार ज्या सूचना एकासारख्य आहेत, त्याची सुनावणी स्वतंत्रपणे न करता, त्यावर गटागटाने सुनावणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं(Election Commission) दिल्या आहेत.
24 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
महानगरपालिकेचा प्रभाग रचना प्रारूप आराखडा1 फेब्रुवारीला प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्यावर नागरिक, राजकीय पक्ष यांच्या हरकती व सूचना मागवन्यात आलया. या हरकती व सूचनांवर निष्पक्षपातीपणे सुनावणी व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची नियुक्ती केली आहे. येत्या 24 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
काम उरकण्यासाठी दिल्या ‘या’ सूचना
महानगरपालिकेतील सूचना व हरकतीचा अहवाल 2 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला पाठवायचा आहे. प्रत्येक हरकतीची स्वतंत्र सुनावणी घेतल्यास मुदतीत हे काम होणार नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया वेगाने पार पाडण्यासाठी एक प्रकारच्या अथवा काही विशिष्ट प्रभागांशी संबंधित विविध व्यक्तींकडून हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. अशा हरकतदारांची मागणी एक प्रकारची असल्यास, त्या सर्व हरकतदारांचा एक गट करून सुनावणी घ्यावी असे आदेश आयोगाने दिले आहेत.
बोलेरोपासून स्कॉर्पिओपर्यंत महिंद्राच्या गाड्यांवर मिळतोय मोठा डिस्काउंट, आताच जाणून घ्या ऑफर!