Avinash Bhosale | बिल्डर अविनाश भोसले यांच्यावर ED ची धाड

| Updated on: Feb 10, 2021 | 1:17 PM

बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED ने छापेमारी केली आहे.

Avinash Bhosale | बिल्डर अविनाश भोसले यांच्यावर ED ची धाड
अविनाश भोसले
Follow us on

पुणे : बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED ने छापेमारी केली आहे. ED चे अधिकारी सकाळी 8:30 पासून ABIL हाऊसमध्ये झाडाझडती करत आहेत. अविनाश भोसले हे मोठे बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक आहेत. फेमासंबंधीच्या प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. हे 6 वर्षांपूर्वीचे विदेशी चलन प्रकरण आहे. (ED raid on Pune builder Avinash Bhosale in FEMA case )

गेल्या काही दिवसांपासून ED च्या फेऱ्यात चौकशीला सामोरे जात असलेले पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ED ने छापा टाकलाय. सकाळी साडे आठ वाजताच ईडीचं पथक पुण्यातील ABIL या कार्यालयात दाखल झालं. केंद्रीय सुरक्षा दलाच्या गार्डचा पहारा सध्या या कार्यालयात आहे. विदेशी चलन प्रकारात चौकशी सुरु असताना ईडीचं पथक थेट पुण्यात तळ ठोकून बसल्याने, भोसले यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

यापूर्वीही ईडीकडून चौकशी

दरम्यान, अविनाश भोसले यांची यापूर्वीही ईडीने चौकशी केली होती. नोव्हेंबर महिन्यात तब्बल दहा तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. FEMA कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आल्याचं वृत्त आहे. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या.

मुलीलाही नोटीस? 

अविनाश भोसले यांच्यासह त्यांच्या मुलीला म्हणजेच राज्याचे कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती आहे. दोन आठवड्यापूर्वीच हे वृत्त आलं होतं. मात्र याबाबत विश्वजीत कदम यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

कोण आहेत अविनाश भोसले?

  • अविनाश भोसले यांना ओळखणाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते 80च्या दशकात रिक्षा चालवत होते.
  • त्यानंतर त्यांचा बांधकाम व्यवसायाशी संबंध आला आणि ते सरकारी कंत्राटदार बनले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
  • आज ते कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. पुण्यात त्यांना रिअल इस्टेट किंग म्हणून ओळखले जाते.

बाणेरमध्ये व्हाईट हाऊस

  • पुण्याच्या बाणेर येथे भोसले यांचा पॅलेस आहे. व्हाईट हाऊस असं त्याचं नाव आहे.
  • सफेद रंगाच्या या पॅलेसचा लूक अमेरिकेच्या व्हाईट हाऊस सारखाच आहे.

कन्येच्या लग्नाला सेलिब्रिटींची मांदियाळी

  • अविनाश भोसले यांची कन्या स्वप्नाली हिचा विवाह माजी मंत्री, दिवंगत पतंगराव कदम यांचे चिरंजीव आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्याबरोबर झाला होता.
  • पुण्यातील सर्वात रॉयल विवाह सोहळा म्हणून हा विवाह सोहळा ओळखला जातो.
  • या विवाहाला अभिनेता सलमान खान यांच्यासह तत्कालीन केंद्रीय मंत्रीही आले होते.

संबंधित बातम्या  

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले यांची 10 तास चौकशी; ईडी कार्यालयातून बाहेर

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस : सूत्र