पुणेः कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर विजयी झाल्यामुळे महाविकास आघाडीला आता बळ मिळाले आहे. ही निवडणूक जनसामन्य लोकांनी आपल्या हातात घेतली होती. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही पक्षाचं आणि पैशाचा कोणताही परिणाम झाला नाही असं स्पष्ट मत काँग्रेसचे आमदार आणि पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे निरीक्षक संग्राम थोपटे यांनी सांगितले.
पुण्याच्या पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांचा 11,040 मतांनी विजयी झाले होते. आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी सांगितले की, हा विजय एका काँग्रेस पक्षाचा नसून महाविकास आघाडीच्या सहकार्यामुळे झाला आहे.
त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये झालेली लढत खऱ्या अर्थाने जनसामान्यांच्या प्रयत्नामुळे विजयी झाल्याचेही संग्राम थोपटे यांनी यावेळी सांगितले.
पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांचाच विजय होणार हे अगदी निवडणुकीचा फॉर्म भरल्याच्या दिवसासून पक्का होता. कारण सर्वसामान्य माणसांनी रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराची सूत्रं हाती घेतली होती. त्यामुळे धंगेकर यांच्या विजयाची आम्हाला खात्री होती असा विश्वासही आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.
कसबा पोटनिवडणुकीत धंगेकर यांना सर्वसामान्यांचा आशीर्वाद मिळाला आहे. प्रचारयंत्रणेतही सामान्य माणूस सांगत होता की, यावेळी रविंद्र धंगेकरच.
कसबा पोटनिवडणुकीत सोळा उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये रविंद्र धंगेकर यांना संधी देण्यात आली. मात्र त्यांच्या कामामुळेच मतदारांनी त्यांना विजयी केल्याचेही यावेळी सांगण्यात आले. भाजपने पैसे वाटप केले म्हणून धंगेकर यांनी उपोषणही केले होते.
तर मंत्र चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. त्यामुळे धंगेकर यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले की, उमेदवार कोणताही असो त्याला तुच्छ लेखू नये. धंगेकर चार टर्म नगरसेवक म्हमून त्यांनी परिसरात काम केले आहे.
तर पुण्यात त्यांची आरोग्यदूत म्हणूनही त्यांची ख्याती आहे. त्यामुळे त्यांना कधीही आणि कुठेही फोन करा माणसांची कामं करणारा नेता म्हणूनही त्यांची ओळख असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ही निवडणूक सर्वसामान्य माणसांची होती त्यामुळेच धंगेकर हे विजयी झाले आहेत. त्याचबरोबर हा कसबा पॅटर्न आता राज्याला वेगळी दिशा देणारा ठरणार आहे.
त्यामुळे हा कसबा पॅटर्न आता राष्ट्रीय पातळीवरही त्याचा विचार केला जाऊ शकतो असंही यावेळी सांगितले. तसेच यावेळी राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रा काढली होती. त्याचाही फायदा या पोटनिवडणुकीत झाला आहे असं आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.