बारामती, पुणे : ऊस तोडणीसाठी निघालेल्या मजुरांच्या ट्रॉलीला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने धडक दिली आहे. या अपघातात सात मजुरांसह नऊ जण गंभीर जखमी (Seriously injured) झाले आहेत. याप्रकरणी बारामती पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. बारामती मोरगाव रस्त्यावर नेपतवळणजवळ पावणेपाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात (Accident) झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या माहितीनुसार, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे ऊसतोडणी मजूर आपल्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून ऊस तोडणीसाठी जात होते. पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास बारामती (Baramati) मोरगाव रस्त्यावरील नेपतवळण येथे पाठीमागून येणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. यात सात मजुरांसह तब्बल नऊजण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी आता गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या भीषण अपघातात वाहनांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.
या अपघातात एकनाथ गर्दाळ चव्हाण, हिराबाई एकनाथ चव्हाण, भाऊसाहेब एकनाथ चव्हाण, बाजीराव तुकाराम जाधव, मंजुळा बाजीराव जाधव, अशोक एकनाथ चव्हाण, अंजू अशोक चव्हाण, रवींद्र बाजीराव जाधव (4 वर्ष), राधा बाजीराव जाधव (दीड वर्षे), इम्तियाज मलिक (चालक), साहिल मलिक हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना बारामती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.