पिंपरी चिंचवड : देशातील काही राज्यांमधून कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर झाल्याचा पाहायला मिळत आहे. दिल्लीत मंगळवारी 1500 पेक्षाही जास्त रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागा सतर्क झाले होते. तर एकाच दिवसात पाच जणांचा मृत्यू झाल्यामुळेही देशाची राजधानी दिल्लीत चिंतेचे वातावरण पसरले आहे. एकीकडे देशाच्या राजधानीत कोरोनाची परिस्थिती चिंताग्रस्त असतानाच राज्यातील पुण्यातही चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. कारण एका वयोवृद्ध महिलेचा 13 एप्रिल रोजी कोरोनाचा रिपोर्ट सकारात्मक आला होता, तर त्याच महिलेचे 14 रोजी निधन झाल्याने आता पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.
पुण्यात कोरोनामुळे 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेचा 14 एप्रिल रोजी मृत्यू झाला आहे. या महिलेला कोरोनासह मधुमेह, उच्च रक्तदाब व संधिवात हे जुने आजार होते.
त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र 13 एप्रिल रोजी त्यांची कोरोनाची चाचणी केल्यानंतर मात्र त्यांचा अहवाल सकारात्मक आला होता. कोरोना रुग्णाचा आता मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुणे शहरात आजपर्यंत 164 सक्रिय रुग्ण आहेत, त्यातील 2 जण रुग्णालयात दाखल आहेत, तर गृह विलगीकरणात 162 रुग्ण आहेत.
मागील चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता महाराष्ट्रातील आरोग्य विभागहा सतर्क झाला आहे. 1 जानेवारीपासून कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला असल्याचेही त्यांनी सांगितेल.
पुण्यात ज्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ती महिला ही 75 वर्षीय वयोवृद्ध महिला दोन्ही गुडघ्यांचे प्रत्यारोपण करण्याकरिता 9 एप्रिल रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 एप्रिल रोजी दोन्ही गुडघ्यांचे प्रत्यारोपणही करण्यात आले.
त्यानंतर 12 एप्रिल रोजी रुग्णालयातदाखल असताना रुग्णास श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यानंतर 13 एप्रिल रोजी कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आली आणि 14 एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला असल्याचेही त्यंनी यावेळी सांगितले