पुणे : उरुळी कांचनमधील (Uruli Kanchan) महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या (Students) रिक्षाला (Rickshaw) अपघात (Accident) झाला आहे. अकरा विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सर्वांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाळकरी मुलांच्या वाहनांना अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. कधी जास्त वेगामुळे तर कधी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे अपघात होत आहेत. अनेकवेळा क्षमतेपेक्षा अधिका विद्यार्थी वाहनांमध्ये बसवले जातात. एकतर वाहन लहान असते. त्यात अतिरिक्त माणसे बसवल्याने वजन पेलवण्याची क्षमता या वाहनांमध्ये नसते. त्यामुळे वाहने पलटी झाल्याचेही प्रकार पहावयास मिळतात. आता या खासगी रिक्षाला अपघात झाला आहे. रस्त्याकडील झुडपात ही रिक्षा घुसल्याचे दिसत आहे. यात जवपास अकरा विद्यार्थी जखमी झाले.
पुणे ग्रामीण हद्दीतील यवत पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले, की हा अपघात उरुळी कांचन शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर सकाळी 7.30 च्या सुमारास झाला. रिक्षात उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील सुमारे 12 विद्यार्थी होते. प्राथमिक माहितीनुसार जखमी विद्यार्थ्यांचे वय 7 ते 12 वर्षे आहे.
अधिकारी पुढे म्हणाले, की बाजारात द्राक्षे घेऊन निघालेल्या पिकअप ट्रकने सोलापूर ते पुणे लेनवर रिक्षाला मागून धडक दिली. धडकेमुळे रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून चालक व 10 ते 12 विद्यार्थी जखमी झाले आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. चालक आणि गंभीर जखमी झालेल्या काही विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.