पुणेः नुकताच झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालामध्ये कसब्याचीही पोटनिवडणूक प्रचंड चुरशीत पार पडली आहे. पोटनिवडणुकीच्या रिंगणात विजयी झालेले महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यामध्ये मोठी चुरस झाली. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मतदारांचे आभारही मानले आहेत. या घटना ताज्या असतानाच आता भाजपचे कसब्यातील उमेदवार हेमंत रासने यांच्याकडून आतापासूनच कसब्यात जनसंपर्क कार्यालय उघडण्याची घोषणा होऊन बॅनरही झळकले आहेत. या बॅनरवर त्यांनी पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ नाशवंत नाही अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत.
त्यामुळे कसबा मतदार संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कसबा पोटनिवडणुकीकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते.
प्रत्येक उमेदवारांना आपापल्या उमेदवारीवर विश्वास व्यक्त करत या निवडणुकीत विजय आपलाच आहे असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता.
त्यानंतर या निवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाले होते मात्र आता या निवडणुकीनंतरही हेमंत रासने यांनी बॅनरबाजी करत पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही असा इशाराच विरोधकांना त्यांनी दिला आहे.
भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी ‘पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही’ अशी बॅनरबाजी तर केली आहेच मात्र त्याचबरोबर आता कसब्यातील प्रत्येक विभागात जनसंपर्क कार्यालयही उघडणार असल्याचे त्यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता आणि या कसबा मतदारसंघाकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
पुण्यातील कसब्यात आताच हे बॅनर लागल्यामुळे या बॅनरची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ‘पेटेन उद्या मी नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही’ या आशयाचे बॅनर लागल्यामुळे भाजपसह विरोधकांमध्येही याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
त्यामुळे 2024 ची निवडणुकीला अजून बराच कालावधी असला तरी हेमंत रासने यांच्या या बॅनरबाजीमुळे कसबा मतदार संघाकडे आता साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.