पुणे – बंडखोर आमदार तानाजी सावंत (MLA Tanaji Sawant)यांच्या विरोधात कट्टर शिवसैनिक संतापले असून अनेक ठिकाणी हिंसक होत तोडफोड करण्यास सुरुवात केली आहे.सावंत यांच्या पुण्यातील बालाजी नगर(Balaji Nagar) कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेनेनंतर तानाजी सावंत आपल्या फेसबुक पेजवर ‘ आमचे गटनेते मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब(Eknath Shinde) यांच्या आदेशानुसार आम्ही संयम बाळगून आहोत. एकदा हा राजकीय प्रश्न सुटला की येणाऱ्या काळात जशाच तसे उत्तर दिले जाईल. माझी नम्र विनंती आहे प्रत्येकाने आपल्या औकातीत राहावं.’ अशी पोस्ट लिहित तोडफोड करणाऱ्या शिवसैनिकांना सज्जड इशारा दिला आहे.
पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत असतांना चिडलेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजीही केली. या गद्दारांचं करायचं काय खलीमुंड वर पाय, यावेळी शिव सैनिकांनी तानाजी सावंत व एकनाथ शिंदे यांच्या फोटोना काळ फासण्यात आले आहे. आंदोलकांनी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करत असतानाच कार्यालयातील फलकांना काळ फसल आहे तसेच काळ्या रंगाने त्याच्यावर गद्दार असे लिहिले आहे. “आमच्या कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्रास देणाऱ्या सर्व बंडखोर आमदारांना या प्रकाराला सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्या कार्यालयावरही हल्ला करण्यात येणार आहे.” असा इशारा पुण्यात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी दिला आहे.तानाजी सावंत यांनी फेसबुकवर लिहिलेलया या पोस्टवर नेटकऱ्यांनीही संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.