Pune crime : मैत्रिणीला भेटण्यासाठी विमानाची बनावट तिकीटं तर काढली; मात्र पुणे विमानतळावर पोलिसांच्या नजरेतून नाही सुटले

| Updated on: May 11, 2022 | 1:04 PM

सीआयएसएफ अधिकारी गुलजारी मीना (32) यांनी या संदर्भात दोन विद्यार्थ्यांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली करण्यात आले. आम्ही त्यांना अटक केली आहे आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 465नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune crime : मैत्रिणीला भेटण्यासाठी विमानाची बनावट तिकीटं तर काढली; मात्र पुणे विमानतळावर पोलिसांच्या नजरेतून नाही सुटले
पुणे विमानतळ (संग्रहित छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : विमानाची बनावट तिकीटे (Fake plane tickets) दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अभियांत्रिकीच्या दोन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी संध्याकाळचा हा प्रकार आहे. आपल्या वर्गमेत्रिणीला भेटण्यासाठी खासगी विमान कंपनीच्या पुणे-जयपूर विमानाची बनावट तिकिटे दाखवून त्यांनी पुणे विमानतळाच्या (Pune airport) टर्मिनल इमारतीत प्रवेश केला होता. याविषयी विमानतळाचे वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव म्हणाले, की केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) विमानतळाची सुरक्षा सांभाळते. यावेळी त्यांना संशयास्पद काहीतरी दिसले. हे दोन विद्यार्थी जयपूरला जाणारे विमान उड्डाण करण्यापूर्वी विमानतळाच्या टर्मिनलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी त्यांना पकडण्यात आले. आपल्या वर्गमैत्रिणीसोबत काही वेळ घालवायचा आहे, असे विद्यार्थ्यांनी सुरक्षा कर्मचार्‍यांना सांगितले. संबंधित वर्गमित्र जयपूरच्या फ्लाइटमधून जाणार होता.

न्यायालयातून जामीन

सीआयएसएफ अधिकारी गुलजारी मीना (32) यांनी या संदर्भात दोन विद्यार्थ्यांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली करण्यात आले. आम्ही त्यांना अटक केली आहे आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 465नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे जाधव म्हणाले. त्यांना शहराच्या न्यायालयात हजर करण्यात आले, तेथे त्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले, असे ते पुढे म्हणाले.

ऑनलाइन एडिट केली तिकीटे

पोलिसांनी सांगितले, की दोन विद्यार्थ्यांपैकी एक गुलटेकडी येथील व्यापारी कुटुंबातील असून कोंढवा येथील दुसऱ्या विद्यार्थ्याचे वडील एका खासगी कंपनीत काम करतात. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की या दोघांनी टर्मिनल इमारतीच्या प्रवेशद्वारावर त्यांच्या मोबाइल फोनवर तिकिटे दाखवण्यापूर्वी इतर कोणाची तरी तिकिटे डाउनलोड केली आणि ऑनलाइन एडिट करून घेतली. संबंधिक वर्गमित्र मुलगी आणि दोन विद्यार्थी वर्गमित्र असून ते तिसर्‍या वर्षाचे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहेत.