पुणे –सातत्याने महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) सातत्याने खोटे आरोप केले जात आहेत. हे दुदैवी आहे. मला वाटतं की विरोधकांकडे(opposition) दुसरं काहीच नाही बोलायला. त्यामुळे काहीतरी खोटेनाटे आरोप ते करत आहेत. सद्यादेशाच्या समोर महागाईचे खूप मोठे आवाहन आहे . त चहा, तांदूळ , तेलापर्यंत प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता महागाई कमी कशी करावी यावर लक्ष दिले पाहिजे. कारण आज देश आणि देशातील जनतेच्या समोर महागाई कशी कमी करावी हे सगळ्यात मोठं आवाहन आहे. असे मत व्यक्त करत खासदार सुप्रिया सुळे(MP Supriya Sule) यांनी विरोधकांचा समाचार घेतलं आहे. इंदापूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशीसंवाद साधताना त्यांनी हेवक्तव्य केलं आहे.
प्रायव्हेट मेंबर बिल्स नावाचा संसदेत एक प्रकार आहे. त्यानुसार मी राइट टु डिस्कनेक्ट बिल आणले आहे. कामाच्या वेळेव्यतिरिक्त कुणीही व्यक्तीने आपल्याला डिस्टर्ब करु नये, यासाठी हे बिल मांडलं आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे आयुष्य आहे. त्यामुळे कामाच्या वेळेच्या व्यतिरिक्त इमर्जन्सी वगळता कोणत्याही काम करणाऱ्या व्यक्तीला फोन करुन हे करा सांगू नये. कार्यालयीन आयुष्य वगळता प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबियांना , स्वतःला वेळ देता आला पाहिजे यासाठी हे बिल मांडण्यात आल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. सगळ्यांचं असं झालं आहे कि आपले पर्सनल व प्रोफेशनल आयुष्य यामध्ये खूप गल्लत झाली आहे. त्यासाठी स्पष्ट पणे मत मांडणार हे बिल आहे. याबरोबरच दाभोलकरांच्या हत्या करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त त्यांनी केली आहे.
Mercedes Price Hike : 1 एप्रिलपासून मर्सिडीजच्या गाड्या महागणार, जाणून घ्या लेटेस्ट प्राईस