न्यू इयर पार्टीत आपल्या आधी मटण खाल्ल्याने मित्रानेच मित्राला दांडक्याने हाणला, कुठे घडली घटना ?

| Updated on: Jan 04, 2025 | 6:08 PM

हे दोघे मित्र एकमेकांचे मित्र असून खाजगी गाड्यांवर चालक म्हणून काम करतात. नव्या वर्षांचे स्वागत करताना दोघांमध्ये मटण खाण्यावरुन हाणामारी झाली आहे.

न्यू इयर पार्टीत आपल्या आधी मटण खाल्ल्याने मित्रानेच मित्राला दांडक्याने हाणला, कुठे घडली घटना ?
Follow us on

नवीन वर्षांचे स्वागत सर्वत्र धुमधडाक्यात झाले. मात्र अनेक ठिकाणी नववर्षाच्या स्वागताला गालबोट देखील लागलेले आहे. पुण्यातील दोघा मित्रांत मटणा खाण्यावरुन वाद झाला आणि या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाल्याची घटना घडली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी ऐन रंगात आली असताना मटण माझ्या आधी का खाल्ले याचा जाब विचारल्याने  दोघा मित्रात मोठा वाद झाला. यातून एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फावड्याचा दांडा घातल्याची घटना घडली आहे.

पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. पुण्यात नवीन वर्षांचे स्वागत जल्लोषात सुरु असताना येथील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत विचित्र घटना घडली आहे. नव वर्षा निमित्ताने मित्रांची पार्टी सुरु असताना एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या आधी मटण खाल्ल्याने दुसरा मित्र भडकला आणि त्याने त्या मित्राला चांगलीच शिवीगाळ केली. त्यामुळे शब्दाला शब्द वाढत गेला आणि एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या डोक्यात फावड्याचा दा़ंडा मारल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

निगेश म्हेत्रे आणि धम्मपाल सोनवणे हे मित्र नवीन वर्षांचे स्वागत करण्याची तयारी करीत होते. त्यांच्या मटण खाण्यावरुन वाद झाले. आमच्या आधी मटण का खाल्ले असा जाब धम्मपाल सोनवणे याने निगेश याला विचारला. त्यावरुन दोघांमध्ये शिविगाळ झाली. त्यानंतर धम्मपाल सोनवणे याने फावड्याच्या दांड्याने निगेश म्हेत्रे याच्या डोक्यात वार केला. त्यात निगेश हा जबर जखमी झाला.

हे सुद्धा वाचा

दांडक्याने मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार निगेश म्हेत्रे आणि सोनवणे हे दोघे ही एकमेकांचे मित्र असून खाजगी गाड्यांवर चालक म्हणून काम करतात. इतकंच नाही तर ते दोघे ही एकाच खोलीत वास्तव्यास आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने ते पार्टी करत होते. दरम्यान, निगेश तू आमच्या अगोदर मटण का खातोस असा जाब सोनवणे याने विचारला. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात सोनवणे याने निगेश म्हेत्रे याला शिवीगाळ करत फावडयाचे दांडक्याने त्याला मारहाण केली. या हल्ल्यात निगेशच्या डोक्याला जबर मार लागला. याप्रकरणी धम्मपाल सोनवणे याच्यावर भारती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहे.