पुणे: गटारी अमावस्या च्या मुहूर्तावर पुणेकरांनी सकाळपासूनच मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर रांगा लावल्यात. गटारी अमावस्या झाल्यानंतर सुरू होणाऱ्या श्रावण महिन्यात अनेक जण मांसाहार वर्ज्य करतात. त्यामुळे आज मांसाहार प्रेमींनी सकाळपासूनच मटण आणि चिकन च्या दुकानाबाहेर रांगा लावल्यात. कोरोनामुळे निर्बंध असल्याने दुकानांच्या वेळा कमी आहेत. त्यामुळे लवकर मटण, चिकन मिळावं यासाठी लोक गर्दी करतायेत. अनेकांनी आखाड पार्टीचेही आयोजन गटारीच्या निमित्ताने करण्यात आले आहे.
तर नागपुरकरांनीही श्रावणापूर्वी सामिष भोजनाच्या शेवटच्या संधीचा लाभ घ्यायचे ठरवले आहे. त्यामुळे नागपुरातही सकाळपासून चिकन-मटणाच्या दुकानाबाहेर रांगा लागल्या आहेत. विदर्भात मांसाहराचे शौकीन मोठ्या प्रमाणात आहेत. आज रविवार असल्याने आज सगळीकडे चिकन मटणाचा बेत आखण्यात आला आहे. सकाळपासून गर्दी व्हायला सुरुवात झाली असून दुपारपर्यंत यात वाढ होईल, असे दुकानदार सांगतात. मात्र काही जणांनी श्रावणाच्या आधीचा बेत शुक्रवारीच आटपला. कारण विदर्भात आज जिवती हा सण साजरा केला जातो. मात्र तरीही गर्दी मात्र कमी नाही, असे मांसविक्रेत्यांचे म्हणणे आहे.
इंधन दरवाढ आणि महागाईमुळे अगोदरच घायाकुतीस आलेल्या सामान्य नागरिकांच्या अडचणीत आता आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे. कारण, श्रावण महिन्यानंतर चिकन आणि अंड्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बाजारपेठेतील जाणकारांच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांमध्ये अंडी आणि चिकनच्या दरात 20 ते 25 टक्क्याची वाढ होऊ शकते. कुक्कुटपालनाच्या खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ अटळ असल्याचे मानले जात आहे.
बाजारपेठेतील जाणकारांच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांमध्ये अंडी आणि चिकनच्या दरात 20 ते 25 टक्क्याची वाढ होऊ शकते. कुक्कुटपालनाच्या खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ अटळ असल्याचे मानले जात आहे. सोया मीलची किंमत 35 रुपये प्रतिकिलोवरुन 90 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली आहे. तर मक्याचा भाव प्रतिकिलो 21 रुपयांवरुन 40 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या सगळया घटकांमुळे कोंबड्यांच्या उत्पादनाचा खर्च 75 रुपयांवरून 100 रुपयांवर गेला आहे. उत्पादन खर्चातील या वाढीमुळे अंडी आणि चिकनचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढतील असा अंदाज आहे.
संबंधित बातम्या:
मांसाहार प्रेमी पाहुण्यांसाठी स्वादिष्ट पर्याय… मटण दम बिर्याणी
पुणेकरांना लागली बिर्याणीची चटक; शहरातील बिर्याणी उपहारगृहांमध्ये लक्षणीय वाढ