पुणे : सतत विविध कारणांमुळे चर्चेत राहणारी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil Dance) आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सांगलीतील कार्यक्रमात तिने केलेला डान्स तुफान व्हायरल झाला. तिच्या या परफॉर्मन्सवेळी तुफान गर्दी झाली होती. त्यानंतर तिने विविध विषयांवर आपली मतं उघडपणे मांडली आहेत. राजकारण,डान्स, प्रसिद्धी, सिनेमा अशा विविध मुद्द्यांवर गौतमी पाटील (Gautami Patil) बोलती झालीय.
सांगलीतील कार्यक्रमात ती डान्स करत असताना तुफान गर्दी झाली. यावेळी लोक अक्षरश: दिवाने होऊन गौतमीचा डान्स पाहात होते. घराच्या शाळेच्या छतावर जाऊन त्यांनी कार्यक्रमाचा आस्वाद लुटला. यावेळी लोकांच्या गर्दीमुळं शाळेच्या छताची कौलं तुटली. तसंच झाडावरही लोकांनी गर्दी केली होती. लोकांच्या गर्दींमुळं एक झाडही यावेळी तुटलं. यावरही गौतमीने भाष्य केलंय.
सांगलीत काल जो प्रकार घडला. त्याबद्दल मलाही वाईट वाटतंय. लोकांनी माझा डान्स पाहायला गर्दी केली याचा आनंद आहेच. पण त्यामुळे शाळेच्या छताचं आणि झाडाचं नुकसान झालं. याचं दु:ख वाटतंय, असं गौतमी म्हणाली.
मला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे माझ्या कार्यक्रमांना गर्दी होते. पण लोक कधी कधी अतिउत्साह दाखवतात. त्यामुळे अनुचित प्रकार घडतो. जो प्रकार घडला. त्याबद्दल मी माफी मागते, असं गौतमी म्हणाली आहे.
Gautami Patil Sangli bedag Dance show #gautamipatil #trending #viral #dance #MarathiNews pic.twitter.com/Hdg8xnqsPo
— Soneshwar Patil (@soneshwar_patil) November 1, 2022
गोतमीवने आपल्या भविष्यातील कामावरही भाष्य केलंय. लवकरच मी एका चित्रपटात काम करणार आहे, असं गौतमी म्हणाली. राजकारणात येणार का? असं विचारताच सध्या मी माझ्या डान्सकडे लक्ष देतेय. सध्यातरी माझा राजकारणात येण्याचा विचार नाहीये, असं गौतमी म्हणाली आहे.
मी माझी कला चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत होते. माझ्या डान्सवर लोकांना आक्षेप होता. त्यामुळे आता मी माझ्या नृत्यात बदल केला आहे. आता त्यात अश्लीलता वाटावं असं काहीच नाहीये, असं गौतमी म्हणाली आहे.