पुणे: आम्ही नारायण राणेंच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही. पण भाजप त्यांच्या पाठीशी आहे, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यानंतर आता भाजप नेते गिरीश बापट यांनी राणेंना घरचा आहेर दिला आहे. राजकीय पक्षात मतभेद असतात. पण बोलताना पथ्य पाळलं पाहिजे, अशा शब्दात गिरीश बापट यांनी राणेंना घरचा आहेर दिला. (girish bapat advised narayan rane to his comments)
भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना नारायण राणेंना घरचा आहेर दिला. राजकीय पक्षात मतभेद असतात. पण सर्वच पक्षातील नेत्यांनी बोलताना भाषण करताना काही पथ्य पाळली पाहिजेत. त्यात सर्वच पक्ष आहेत. त्यात मुख्यमंत्री असतील, नारायण राणे असतील यांनी आपआपली मते मांडायला हरकत नाही. पण अनेक गोष्टीत अडचणी दिसतात, मग त्याचं रुपांतर नको त्या गोष्टीत होतं. हे सर्वांनी टाळलं पाहिजे, असं बापट म्हणाले.
सर्वच राजकीय नेत्यांनी बोलताना पाथ्य पाळायला हवं. तसेच सामान्य जनतेला जे आवडतं ते केलं पाहिजे. जनतेत जाऊन कामं केली पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध केला. आम्हाला चार सदस्यीय प्रभाग पद्धती हवी आहे. त्यामुळे एक सदस्यीय प्रभाग पद्धतीला आमचा विरोध आहे. हा सगळा राज्य सरकारचा निर्णय आहे, कॅबिनेट काय निर्णय घेते ते बघू, असं बापट यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 24 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद घेऊन राणे यांच्या वक्तव्यास समर्थन नसल्याचं म्हटलं होतं. मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीबाबत बोलणं कोणत्याही चुकीच्या विधानाचं समर्थन केलं जाणार नाही. आम्ही नारायण राणेंच्या विधानाचं समर्थन करत नाही. पण भाजप राणेंच्या पूर्णपणे पाठिशी आहे, असं फडणवीस म्हणाले होते.
तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना निर्लज्ज म्हणता, मंत्र्यांना लाथा घाला म्हणता, चौकीदार चोर है म्हणता त्यावर गुन्हे दाखल का होत नाही? आमच्या कुटुंबा विरोधात, पत्नी विरोधात तुम्ही काय काय म्हणता त्यावर कारवाई होत नाही, ही दुटप्पी भूमिका घेऊन चालणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला होता. (girish bapat advised narayan rane to his comments)
100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 26 July 2021 https://t.co/f9lqxn4AoF #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 26, 2021
संबंधित बातम्या:
अग्रलेखाची जबाबदारी या संजय राऊतची, रश्मी ठाकरेंची नाही, राऊत कडाडले
भाजप फार महान पक्ष, परग्रहावरील लोकांवरही गुन्हा दाखल करू शकतो; राऊतांनी उडवली खिल्ली
अनिल परब पोलिसांच्या संपर्कात असलेला व्हिडीओ, आता त्याच व्हिडीओत दिसणारे उदय सामंत म्हणतात..
(girish bapat advised narayan rane to his comments)