Girish Mahajan : गिरीश महाजन माझ्या चपला घेऊन फिरले, त्यामुळे त्यांना काळजी, खडसेंचा महाजनांना जोरदार टोला

| Updated on: Jul 10, 2022 | 5:55 PM

गिरीश महाजन यांनी खडसेंना खडसे गेले दर्शनाला आणि चप्पल गेली चोरी म्हणत खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता गिरीश महाजन हा नेहमी माझ्या पादत्राणांच्या जवळ वाढले, म्हणत खडसेंनी महाजन यांच्यावर पलटवार केलाय.

Girish Mahajan : गिरीश महाजन माझ्या चपला घेऊन फिरले, त्यामुळे त्यांना काळजी, खडसेंचा महाजनांना जोरदार टोला
गिरीश महाजान माझ्या चपला घेऊन फिरले, त्यामुळे त्यांना काळजी, खडसेंचा महाजनांना जोरदार टोला
Follow us on

पुणे : एकनाथ खडसे (Eknath Khadase) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचं राजकीय प्रेम हे सबंध महाराष्ट्राने एकनाथ खडसे भाजपमधून (BJP) बाहेर पडल्यापासून पाहिलं आहे. एकनाथ खडसे यांनी भाजप उत्तर महाराष्ट्रात वाढवली, त्याच मुशीत गिरीश महाजन यांच्यासारखे अनेक भाजप नेते तयार झाले. मात्र वेळोवेळी खदखद बाहेर आल्यानंतर शेवटी कंटाळून एकनाथ खडसे यांनीच भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधलं. मात्र त्यानंतर खडसे आणि महाजनांचे मतभेद उघडपणे चव्हाट्यावर आले. तो वाद अजूनही सुरूच आहे. आता खडसे राष्ट्रवादीतून आमदार झाले आणि सरकारच पडलं. त्यानंतर गिरीश महाजन यांनी खडसेंना खडसे गेले दर्शनाला आणि चप्पल गेली चोरी म्हणत खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता गिरीश महाजन हा नेहमी माझ्या पादत्राणांच्या जवळ वाढले, म्हणत खडसेंनी महाजन यांच्यावर पलटवार केलाय.

आयुष्यभर पादत्राने घेऊन चालले

एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या टीकेबाबत बोलताना गिरीश महाजन हे आयुष्यभर माझ्याच पादत्राणापाशी वाढल्याची आठवण त्यांना करून दिली. तसेच गिरीश महाजन यांनी आयुष्यभर माझ्या चपलांची पूजा केली. स्वाभाविक त्यांचं लक्ष माझ्या चपलांजवळच असणार, माझ्या चपला घेऊनच ते चालत होते, तसेच मत मागत होते. त्यामुळे माझ्या चपलांची त्यांना जास्त काळजी वाटते. असा टोलाही खडसेंनी लगावला आहे. तसेच गिरीश महाजन हे बालिश आहेत. त्यांना कोणीही सिरीयस घेत नाही. असे म्हणत खडसेंनी महाजनांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

खडसांना महाजनांचं जोरदार प्रत्युत्तर

आता राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेत आमदार झाल्यावर खरं तर वाटत होतं की आपण मंत्री होऊ, पण सर्व गोष्टी मनासारख्या होत नाहीत. खडसेंनी विधान परिषदेची शपथ घेतली आणि महाविकास आघाडीत आले आणि महाविकास आघाडीचं सरकारच गेलं. त्यामुळे खडसेंना तर आमदारकीवरच समाधान मानावं लागेल, पंगत बसली आणि बुंदी संपली सोशल असं सोशल मीडियावर असं ऐकलं होतं. त्यापेक्षा मी असं ऐकलं मंदिरात गेले आणि प्रसाद संपला, मंदिराच्या बाहेर गेले आणि शप्पल चोरीला गेली, असे म्हणत गिरीश महाजन यांनी खडसेंचे खिल्ली उडवली होती, सोशल मीडियावर अनेक गमती जमती घडतात. तसाच एक योगायोग खडसेंच्या बाबतीत घडलाय, असेही गिरीश महाजन म्हणाले होते, त्यालाच आता खडसेंनीही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.

आज एकनाथ खडसे हे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील निवासस्थानी भरणे कुटुंबीयांचे सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी यादेखील उपस्थित होत्या, माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रींचे एक जुलै रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते, याच पार्श्वभूमीवर त्यांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी खडसे पती-पत्नी भरणेंच्या निवासस्थानी आले होते, त्यावेळी खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.