पुणे : निवडणुकीत उमेदवार जिंकला की कार्यकर्ते त्याला खांद्यावर उचलताना आपण (Wife Carry Husband On Shoulder After He Won) अनेकदा पाहिलं असेल. पण, पुण्यातील पाळू ग्रामपंचायतीत पती निवडूण आल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी पत्नीने चक्क पतीलाच खांद्यावर घेत मिरवणूक काढली (Wife Carry Husband On Shoulder After He Won).
पुणे जिल्ह्यातील पाळू ग्रामपंचायतीमध्ये जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने 7 पैकी 6 जागावर वर्चस्व मिळवले. या घवघवीत यशामागे महिलांचा मोठा मोलाचा वाटा होता. त्यामुळे विजयाचा जल्लोष करत असताना गावातील विजयी उमेदवाराच्या पत्नीने आपल्या पतीच्या विजयायासाठी जल्लोष साजरा केला.
पाहा व्हिडीओ –
पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव यांनी 221 मतं मिळवत विरोधी उमेदवारावर दणदणीत विजय मिळवला. पतीने इतकं मोठं यश मिळवल्याने पत्नी रेणुका गुरव यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी थेट पतीला खांद्यावर घेत जल्लोष साजरा केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक जिंकल्यावर जल्लोष करण्यास, गुलाल उधळण्यास, तसेच जास्त कार्यकर्त्यांना एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आली होती. त्या कायद्याचं पालन करत आनंद साजरा करण्यासाठी स्वत: पतीराजांना खांद्यावर घेतलं आणि गावात त्यांची विजयी मिरवणूक काढली.
पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील खडकवाडीमधील ग्रामपंचायत निकालानंतर विजयी मिरवणूक काढणाऱ्या 15 ते 20 जणांविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आणि दोन महिला सदस्याच्या पती आणि अन्य काही जणांचा समावेश आहे. अनिल सखाराम डोके, संतोष चंदर डोके, गुलाब वाळुंज, सुभाष लहू सुक्रे यांच्या सह 15 ते 20 जणांवर 188 ,135 कलामां अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावामध्ये जेसीबीच्या रोडरमध्ये गुलाल-भंडारा भरुन विजयी उमेदवाराची मिरवणूक काढून पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मिरवणुकीत वापरलेला जेसीबी मंचर पोलिसांनी जप्त केला आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : प्रतिभाताई पाटलांच्या भाचेसूनेचा ईश्वर चिठ्ठीने पराभव https://t.co/ifc1w31ekl #PratibhaPatil | #Jalgaon | #GramPanchayatElectionResults | #गुलालकुणाचा
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 19, 2021
Wife Carry Husband On Shoulder After He Won
संबंधित बातम्या :
अहमदनगरमध्ये वेगळाच ट्विस्ट, ‘नोटा’ला सर्वाधिक 502 मतं, विजयी कोण?
सोलापुरात सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य, ऋतुराजची अवघ्या 21 वर्षात ग्रामपंचायतीत एन्ट्री
महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : जळगावात महाविकास आघाडीच्या ताकदीसमोर भाजप निष्प्रभ