पुणे : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी सरासरी 79 टक्के मतदान झालं. उद्या (18 जानेवारी 2020) सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाला अवघे काही तास उरले आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नुकतंच पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Gram Panchayat result Prohibition for Celebration after Win In Pune)
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर ठिकठिकाणी जल्लोषात विजयी मिरवणुका काढल्या जातात. फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मात्र ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. नुकतंच पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार सोमवारी पहाटे 12 पासून ते रात्री 12 पर्यंत दिवसभर मिरवणुका काढणे, रॅली काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे या सर्व गोष्टींना बंदी असेल, असे यात नमूद करण्यात आले आहे.
तसेच सोमवारी रात्री 10 पासून ते मंगळवारी 6 पर्यंत हॉटेल, ढाबे, खानावळी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही यात म्हटले आहे.
राज्यात कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायत निवडणुका?
ठाणे- 143, पालघर- 3, रायगड- 78, रत्नागिरी- 360, सिंधुदुर्ग- 66, नाशिक- 565, धुळे- 182, जळगाव- 687, नंदुरबार- 64, अहमनगर- 705, पुणे- 649, सोलापूर- 593, सातारा- 652, सांगली- 142, कोल्हापूर- 386, औरंगाबाद- 579, बीड- 111, नांदेड- 1013, परभणी- 498, उस्मानाबाद- 382, जालना- 446, लातूर- 383, हिंगोली- 421, अमरावती- 537, अकोला- 214, यवतमाळ- 925, वाशीम- 152, बुलडाणा- 498, नागपूर- 127, वर्धा- 50, चंद्रपूर- 604, भंडारा- 145, गोंदिया- 181 आणि गडचिरोली- 170. अशाप्रकारे राज्यात एकूण 12 हजार 711 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान पार पडलं.
ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा
निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
एकूण प्रभाग- 46,921
एकूण जागा- 1,25,709
प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880
(Gram Panchayat result Prohibition for Celebration after Win In Pune)
संबंधित बातम्या :