पुणे : सायबर क्राईम ही सध्या डोकेदुखीचा विषय ठरत आहे. कुणीही येत अकाउंट हॅक करतं आणि भलतंच करून टाकतं. यातून सोशल मीडियात बदनामी होते. यामुळे काही जण नाराज आहेत. या हँकर्सला धडा शिकवणे गरजेचे आहे. सायबर क्राईमसाठी विशेष प्रशिक्षण घेतलेले लोकं काम करतात. सायबर गुन्हेगाराला शोधून काढले जाते. असेच एक प्रकरण पिंपरी चिंचवड येते उघडकीस आले. मोठ-मोठ्या नेत्यांचे व्हिडीओ मार्फ करणे, फेसबूक अकाउंट हॅक करणे एका गुन्हेगाराला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी परराज्यात जाऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांचे फोटो आणि व्हिडीओ मॉर्फ करणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. देशातील बड्या नेत्यांची बदनामी करणाऱ्या या विकृताला थेट रांचीतून अटक करण्यात आलीय. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली.
शमीम जावेद अन्सारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणांचं नावं आहे. तो झारखंडच्या रांचीचा रहिवासी आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवडमधील राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर तब्बल तीन महिने तपास करून सायबर पोलीस शमीमपर्यंत पोहोचले आहेत.
शमीमने अमर साबळे यांचे फेसबुक अकाउंटही हॅक केले होते. व्हिडीओ-फोटो मॉर्फ करणे, अचानक व्हिडीओ कॉल करून अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करणे. अकाउंट हॅक करून फसवणूक करण्याचे प्रकार सर्रास घडतात. अशांनी सायबर विभागाकडे तक्रारी केल्यास त्यांची ही यातून सुटका होऊ शकते.
या हॅकर्सने मोठ्या प्रमाणात व्हिडीओ मार्फ केल्याचे दिसून आले. शिवाय काही फेसबूक अकाउंटही हॅक केले. त्यामुळे पुण्याच्या सायबर सेलने त्याची माहिती गोळा केली. त्यानंतर त्याला रांची येथून अटक केली. चोर कुठंही असला तरी पोलिसांनी कसून तपास केल्यास तो सुटत नाही, हे या घटनेतून दिसते.