कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलन केल्यानंतर काल खासदार संभाजी छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत आरक्षणावर चर्चा झाली. मात्र, ही भेट ट्रॅप असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. त्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. स्वत: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर घटना दुरुस्तीशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचं सांगत आहेत. हा विषयच केंद्राचा आहे तर मग हा ट्रॅप कसा असू शकतो?, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे. (hasan mushrif reaction on sambhaji chhatrapati and cm uddhav thackeray visit)
हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला. खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारकडे सहा मागण्या केल्या होत्या. त्यांच्या या सहाही मागण्या मार्गी लागल्या आहेत. सरकार सकारात्मक आहे. स्वत: वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरही केंद्र सरकारने घटना दुरुस्ती केल्याशिवाय आरक्षण मिळणार नसल्याचं सांगत आहेत. त्यामुळे संभाजीराजेंना चर्चेला बोलावणं हा ट्रॅप कसा असू शकतो?, असा सवाल मुश्रीफ यांनी केला.
यावेळी त्यांनी राम मंदिर भूखंड घोटाळ्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. राम मंदिर हा आस्थेचा प्रश्न आहे. त्यावर कोणी संशय व्यक्त करत असेल तर त्याची चौकशी करणं हे केंद्राचं काम आहे. शिवसेना भवनावर जाऊन हा प्रश्न सुटणार नाही, असा टोला लगावतानाच माझी हात जोडून विनंती आहे, जी काही शंका उपस्थित करण्यात आली आहे, तिचं लवकरात लवकर निराकरण करा, अशी मागणी त्यांनी केली.
काँग्रेसने विधानसभेत स्वबळावर लढण्याची भाषा केली आहे. त्यावर विचारताच, निवडणुका अजून लांब आहेत. त्यावर आताच चर्चा करण्यात काही अर्थ नाही. जे काही करायचं आहे. ते वरिष्ठ नेतेच ठरवतील, असं ते म्हणाले. विधानसभा अध्यक्षांची या अधिवेशनात निवड होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक ठेवण्यात आली होती. त्या प्रकरणाचा तपास व्हावा हे मी नेहमी सांगत आहे, असं सांगतानाच सचिन वझे आणि प्रदीप शर्मा हे धाडस करू शकतात का? या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वेगळाच आहे, असंही ते म्हणाले. (hasan mushrif reaction on sambhaji chhatrapati and cm uddhav thackeray visit)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 18 June 2021 https://t.co/hOpnnBvaCK #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 18, 2021
संबंधित बातम्या:
जयंत पाटील शनिवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना भेटणार; ‘या’ विषयावर होणार चर्चा
BHR Scam: ‘माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर हा कसा असेल?’
(hasan mushrif reaction on sambhaji chhatrapati and cm uddhav thackeray visit)