कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी फोन टॅपिंग प्रकरणावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी जो अहवाल दिला होता त्याबाबत राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी अहवाल मुख्यमंत्र्याकडे सादर केला आहे. शुक्ला कारवाई होण्याचे संकेत मिळतं आहेत. रश्मी शुक्ला यांनी जो रिपोर्ट सादर केला होता त्यातील बदल्या नियमानुसार होत्या, असा दावा मुश्रीफ यांनी केला. दुसरीकडे त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बॅटिंगवरही जोरदार टोलेबाजी केली. (Hasan Mushrif slams Devendra Fadnavis over alleged phone tapping by Rashmi Shukla)
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप हे तकलादू आणि लवंगी फटाक्यासारखा होता हे स्पष्ट झालंय, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी केला.
रश्मी शुक्लांच्या चौकशी बरोबरचं सत्ता स्थापनेच्या काळात विधानसभा निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर 2019 ते 24 नोव्हेंबर 2019 पर्यंत सरकार स्थापनेच्या पूर्वसंध्येपर्यंत रश्मी शुक्ला अपक्ष आमदारांच्या संपर्कात होत्या. अपक्ष आमदार राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी दिली. कोट्यवधी रुपयांची ऑफर अपक्ष आमदारांना भाजपला पाठिंबा द्यावा, यासाठी शुक्ला ऑफर देत होत्या. त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. पोलीस अधिकाऱ्यांचे हे कृत्य चुकीचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारवाई करावी, अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली.
देवेंद्र फडणवीसांनी त्या अहवालाच्या आधारे मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ते दिल्लीला गेले त्यांनी गृहसचिवांना पत्र दिले. देवेंद्र फडणवीस यांनी जो थयथयाट सुरू केलाय तो थांबवावा. महाराष्ट्र राज्याची देवेंद्र फडणवीस यांनी आणि रविशंकर प्रसाद यांनी माफी मागावी, अशी मागणी मुश्रीफ यांनी केली. देवेंद्र फडणवीसांनी राज्यात सत्तेत येण्याचं स्वप्न सोडून द्यावं, असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस काल क्रिकेट खेळत होते, लूज बॉल आला तर सीमेपार टोलवतो असे ते म्हणाले. ते एकही बॉल सीमेपार टोलवू शकले नाहीत. एक मारला त्यावर ते झेलबाद झाले असते. त्यांची बॅटिंग बघितली त्यांनी ती करता आली नाही.
अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक ठेवणं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी ते संधी शोधत आहेत. एटीएसनं तपास केला असता तर दोन दिवसात मनसुख हिरेन प्रकरणातील खरे आरोपी समोर आले असते, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला.
‘राजकारणात इतका विश्वास कोणावरच टाकायचा नसतो; फडणवीसजी लूज बॉलवरच मोठी विकेट जाते’ https://t.co/VU9NMcwLyw @rautsanjay61 @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ShivSena #RashmiShukla #PhoneTapping
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 26, 2021
संबंधित बातम्या:
ठाकरे सरकारमधील ‘या’ मंत्र्याचा फोन टॅप होतोय का? ‘त्या’ ट्विटमुळे खळबळ
हर्षवर्धन जाधवांसह महिलेला मारहाण करणाऱ्या आठ जणांवर गुन्हा नोंदवा, कोर्टाचे आदेश
(Hasan Mushrif slams Devendra Fadnavis over alleged phone tapping by Rashmi Shukla)